spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्रात टाकला दरोडा; परराज्यातील टोळी जेरबंद!

महाराष्ट्रात टाकला दरोडा; परराज्यातील टोळी जेरबंद!

spot_img

Maharashtra Crime News: गुजरातमध्ये घडलेलं बहुचर्चित गोध्रा हत्याकांडात जन्मपेठ झालेला आरोपी पॅरोल रजेवर फरार होऊन चक्क महाराष्ट्रात दरोडा टाकला. नगर-कल्याण महामार्गावर पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी उभ्या असलेल्या आयशर टेम्पोमधून टायर चोरीसाठी इतर चार आरोपींची मदत घेत दरोडा टाकल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सलीम उर्फ सलमान युसूफ जर्दा (वय 55) रा. गोध्रा पंचमहाल, ता. गोध्रा, जि. पंचमहाल राज्य गुजरात असे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीचे नाव आहे.

आळेफाटा पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशन व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्यावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात 16 गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे

अधिक माहिती अशी: 7 जानेवारी 2024 रोजी पहाटेच्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच 05 डीके 7633 मधील ताडपत्री व रस्सी तोडून गाडीच्या आतील टीएल मॉडेलचे प्लॅक्स लहान टायर 18 व टी एल मॉडेलचे मोठे टायर लंगोट व ट्यूब असे 22 नग एकुण 2 लाख 49 हजार 622 किंमतीचा मुद्देमाल चोरून नेलेबाबत वाहन चालक सोमनाथ नारायण गायकवाड ( वय 30 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर) यांनी फिर्याद दाखल केली होती. दरम्यान गुन्हयाचा तपास करीत असताना गुन्हे करणारी टोळी ही गुजरात राज्यातील गोवा या ठिकाणची असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. सदर संशयीतांचे मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आयशर टेम्पो कमांक जीजे 14 एक्स 8853 याच्या सहाय्याने केल्याचे निष्पन्न झाले.

त्याप्रमाणे सदर आयशर टेम्पोचा शोध घेऊन सदरचा आयशर टेम्पो चांदवड जि.नाशिक येथून आरोपी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा वय 55 वर्षे, साहील हनीफ पठाण वय 21 वर्षे, सुफीयान सिकंदर चंदकी वय 23 वर्षे, आयुब इसाग सुनठीया वय 29 वर्षे, इरफान अब्दुलहामीद दुरवेश वय 41 वर्षे रा. गोध्रापंचमहाल ता. गोध्रा जि. पंचमहाल राज्य गुजरात यांच्यासह ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता नमुद आरोपींनी आळेफाटा, मंचर तसेच सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.सदर आरोपींकडुन त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेला आयशर टेम्पो गुन्हयातील चोरीस गेला मुद्देमाल असा एकुण 14 लाख 40 हजार 878 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासात गुन्हयातील मुख्य आरोपी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून सदर कालावधीमध्ये तो शिक्षा भोगत असताना 08 वेळेस पॅरोल रजेवर असताना तो परत कारागृहात हजर न होता टोळी बनवून चोरीचे गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याच्या विरोधात महाराष्ट्रातील आळेफाटा पोलीस ठाण्यात 1, मंचर 1, सिन्नर जिल्हा नाशिक 1 असे तीन गुन्हे तर गुजरात राज्यात 13 असे ऐकून 16 गुन्हे दाखल आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुप्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटीलचा कान्हूरपठारला भन्नाट डान्स, पाहण्यासाठी तोबा गर्दी

बैल पोळा उत्साहात साजरा / मानाच्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक कान्हूर पठार | नगर सह्याद्री येथे आपल्या...

सराफाला लुटणारा ड्रायव्हर जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिर्डी येथे सराफ व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांच्या ३.२६ कोटी रुपये...

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईला जाणार्‍या मोर्चाचे पारनेरमध्ये होणार जोरदार स्वागत

पारनेर | नगर सह्याद्री मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई...

नगरमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुडगूस; प्राणघातक हल्ला करत ऐवज लांबविला

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमवाघा वाघा येथे शुक्रवारी मध्यरात्री...