अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महामार्गावर वाहनांच्या प्रतिक्षेत थांबलेल्या हेरून त्यांना वाहनात बसवत पुढे गेल्यावर निर्मनुष्य ठिकाणी कार थांबवून त्यांच्याकडील दागिने, पैसे बळजबरीने हिसकाऊन घेत त्यांना कारच्या खाली उतरवून धुम ठोकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
समीर गफ्फार शेख ( रा.बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर ), वैभव सुरेश कोठाळे ( रा. देवदैठण, ता.श्रीगोंदा), अक्षय दशरथ पडवळ ( रा. बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर ), खंडू उर्फ संदीप मिठू काळे ( रा.नागापूर, ता. जि. अहिल्यानगर ) याचा आरोपींमध्ये समावेश आहे.
फिर्यादी सतीष मधुकर पठारे ( रा.बँक कॉलनी, सुपा, ता.पारनेर) यांना दि.११ फ्रेबुरवारी रोजी अज्ञात आरोपीतांनी कारमध्ये बसवत चाकुचा धाक दाखवून मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर केल्याची घटना घडली होती. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत चार आरोपींना जेरबंद केले. आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता गुन्हयात चोरी केलेली रक्कम आपसात वाटुन घेतल्याची माहिती दिली. त्याच्याकडून ३ लाख रुपये किंमतीची हुंडाई कार, १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ३ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे यांनी बजावली आहे.