अहमदनगर । नगर सहयाद्री-
शेवगाव येथील दरोड्यातील ५ आरोपींना ४८ तासात जेरबंद करण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या आरोपींकडून सुमारे १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली. अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले, रोहन अनिल ऊर्फ यासीनखॉ भोसले, अमर दत्तु पवार, कृष्णा ऊर्फ सागर नारायण भोसले, सुनिल बाबाखॉ भोसले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर दिपक इंदर भोसले (फरार) यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान सोमवारी(१०) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त खबर्या माहिती समजली की, सदर गुन्हा हा अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले याने त्याचे इतर साथीदारांसह गुन्हा केला असल्याचे समजले. नेवासा फाटा परिसरात सदर आरोपी असल्याचे माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी सदर सापळा लावत आरोपींना बेड्या ठोकल्या. दरम्यान अनिल ऊर्फ यासीनखॉ शिवाजी भोसले यांच्यावर नगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत.
८ जुन रोजी दिपक बाबासाहेब जरांगे (रा. मारवाडी गल्ली, शेवगाव) यांच्या घरात चोरट्यांनी घरओडी केली होती. जरांगे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करत चाकुचा धाक दाखवला होता. घरातील सदस्यांना लाथाबुयांनी मारहाण केली होती. घरातील घरातील सोने, चांदी व रोकड असा सुमारे १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल ६ चोरट्यांनी लंपास केला होता. या संदर्भात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करत आरोपींना जेरबंद केले. दरम्यान एक महिन्यापुर्वी चांदगांव उस्थळदुमाला, ता. नेवासा परिसरातील मेडीकल दुकान फोडुन रोख रक्कम व पल्सर मोटार सायकल चोरी केल्याची कबूली आरोपींनी दिल्याचे सांगण्यात आले.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, पोनि दिनेश आहेर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि समाधान भाटेवाल, अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.