spot_img
अहमदनगरचास घाटात दरोडा!; 'ती' टोळी पकडली

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

spot_img

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी नगर तालुक्यातील चास या गावाजळ जेरबंद केले असून त्यांच्याकडून सात लाख ९० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना गेल्या १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्र घडली.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकिस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार लक्ष्मण खोकले, हृदय घोडके, दीपक घाटकर, राहुल द्वारके, सुरेश माळी, अतुल लोटके, भीमराज खर्से, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोखे, सोमनाथ झांबरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, भगवान धुळे, महादेव भांड यांचे पथक तयार करून मालाविरुद्धचे गुन्हे उघडकिस आणण्याबाबत सूचना देऊन या पथकास रवाना केले होते.

गेल्या १० सप्टेंबर रोजी रात्री तपास पथक नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत दरोडा प्रतिबंधक गस्त घालत असताना सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर ते पुणे रस्त्यावर चास घाटाजवळ एक काळ्या रंगाचे इनोव्हा वाहन (क्रमांक एमएच०१-व्हीए – ७४२२) यामधून गौरव घायाळ व अन्य तीन ते चार इसम दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात थांबलेले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने संबंधित ठिकाणी दिनांक १९ रोजी रात्री ०३.५० च्या सुमारास जाऊन खात्री केली असता चास घाटाच्या अलीकडे ते दिसुन आले. पथकानी संबंधित इसमांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे गौरव हरीभाऊ घायाळ (वय-२४ वर्षे रा. सुपा ता. पारनेर), सतीश बाळासाहेब पावडे (वय-३५ वर्षे, मूळ रा. दरोडी, ता. पारनेर हल्ली रा. सुपा, अनिकेत रमेश साळवे (वय- २९ वर्षे रा. ओम एन्टरप्रायजेसच्या पाठीमागे, सुपा ता. पारनेर, विशाल सुरेश जाधव (वय-२३ वर्षे रा. अपधूप रोड, सुपा, ता. पारनेर, गोविंद बबनराव गाडे (वय-३६ वर्षे रा. ग्रामपंचायत मागे, सुपा, ता. पारनेर) असे असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या संशयिताना अंधारात थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. पथकाने पंचासमक्ष संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ३० हजार रुपये किमतीचे एक पिस्टल व एक जिवंत काडतुस, ५०० रुपये किमतीची एक तलवार, १०० रुपये किमतीचे एक गिलव्हर, एक बेसबॉलचा दांडका, ६० हजार रुपये किमतीचे सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, सात लाख रु किमतची एक इनोव्हा चारचाकी वाहन, असा एकुण सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यातील आरोपी नामे १) गौरव हरीभाऊ घायाळ वय-२४ वर्षे रा. सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांचे विरुध्द यापूर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील आरोपींविरुध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

श्रीरामपूर/ नगर सह्याद्री    श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा...

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...