spot_img
अहमदनगरकोरोनानंतर चीनमधील 'सारी' आजाराचा धोका ! लहान मुले होतायेत लक्ष्य..नगर प्रशासनाला सतर्कतेच्या...

कोरोनानंतर चीनमधील ‘सारी’ आजाराचा धोका ! लहान मुले होतायेत लक्ष्य..नगर प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : चीनमध्ये सध्या लहान मुलांना होणार्‍या श्वसनविकाराची नवी साथ सुरु आहे. हजारो बालके याला बळी पडले आहेत. दरम्यान चीन मधील या आजाराबाबत केंद्र सरकारने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

राज्य सरकार आणि जिल्हा पातळीवरील आरोग्य विभागाला याबाबत केंद्राकडून खबरदारीच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा पातळीवरून आता आरोग्य विभाग लहान मुलांना होणार्‍या श्वसनविकारावर (सारी) लक्ष ठेवून आहेत.

देशात आणि राज्यात कोरोनाच्या काळात जी स्थिती होती ती आता पुन्हा उद्भवू नये यासाठी आधीच तयारी सुरु केली आहे. चीनमध्ये सध्या लहान मुलांच्या श्वसनविकाराची साथ आली असून अनेक देशांनी सावधगिरीची खबरदारी घेण्यास सुरुवात केलीये.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं चीनमधल्या लहान मुलांच्या श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील आरोग्य विभाग सक्रीय झाले आहे.

राज्यातील जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळ, प्रयोगशाळा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीनमधील लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचे कारण प्रामुख्याने इन्फ्लूएन्झा, मायकोप्लाझ्मा आणि सार्स कोविड-19 मुळे असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. धोका नसला तरी काळजी घेण्याच्या सूचना ही देश आणि राज्याला देण्यात आल्या आहेत.

त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हे व महापालिका क्षेत्रातील आरोग्य संस्थांना याबाबत माहिती घेऊन नोंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड खाटांची तयारी, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटरची उपलब्धता, मनुष्यबळ तयार करणे, ऑक्सिजन प्लांट, सिलिंडर कार्यान्वित आहेत की नाही याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी म्हटलं आहे की, चीनमध्ये लहान मुलांमध्ये बळावलेल्या श्वसनविकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून सुचना आल्या आहेत. आरोग्य उपसंचालकांनी सारीबाबत दक्षतेच्या सुचना आहेत. त्यानूसार कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या सारीचे रुग्ण आढळलेले नाहीत मात्र, काळजी घेण्यात येत असल्याचेच ते म्हणाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...