spot_img
अहमदनगरतापमानात वाढ; थंडी गायब

तापमानात वाढ; थंडी गायब

spot_img

फेंगल चक्रीवादळाचा परिणाम | दिवसभर ढगाळ वातावरण
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होऊन थंडीमध्ये घट झाली आहे. अहिल्यानगर शहराचा तापमानात देखील बारा तासात 9 अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीच्या प्रमाण ओसरले आहे. सोमवारी तर संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन देखील झाले नाही. पुढील तीन दिवस शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाल्यानंतर काही दिवसातच थंडी वाढू लागली होती. गेल्या आठ दिवसात अहिल्यानगर शहराच्या तापमानामध्ये तब्बल पाच ते सहा अंशांनी घट झाली होती व त्यामुळे थंडीचा कडाका जाणवायला लागला होता. 19 नोव्हेंबरला अहिल्यानगर शहराचे किमान तापमान 11.6 अंश होते त्यामळे सर्वात कमी तापमानाची नोंद अहिल्यानगर मध्ये झाली होती. हवामान विभागाच्या माध्यमातून थंडीची लाट येईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली होती.

त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी तापमानात आणखी घसरण झाल्याने दिवसभर थंड वाऱ्याबरोबर थंडीचा कडाका जाणवत होता. दरम्यान, फेंगल चक्रीवादळाचा परिणाम हा हवेतील वातावरणावर झाला त्यामुळे रविवारी 12 तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस व सोमवारी किमान तापमान 21 तर कमाल 28 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले व तापमानात नऊ अंशाने वाढ झाल्याचे दिसून आले. चक्रीवादळाचा परिणाम होऊन थंडी देखील आता कमी झाली आहे व दोन दिवसात सहा अंशांनी तापमान घसरले आहे. यामुळे काहीसा उकाडा देखील वाढला आहे.

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
वातावरणात बदलामुळे गहू, हरभरा या पिकांवर देखिल परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण या पिकांना थंडी ही पोषक असते व अशा वातावरण बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील पिकांची काळजी घ्यावी अशी आवाहन हवामान तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार्जिंगच्या कारणावरून भिडले! पुढे नको तेच घडले; एमआयडीसीत धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मोबाईल चार्जिंगच्या कारणावरून विद्यार्थ्याला लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी...

समंदर लौट कर आ गया! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री? विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. या नव्या...

पराभवानंतर आमदार थोरात कडाडले; म्हणाले, नवीन आमदार ‘त्यांचे’ हत्यार

संगमनेर । नगर सहयाद्री:- संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा शिंदे गटाचे अमोल...

मोठी बातमी! दिल्लीमधून मिळला ग्रीन सिग्नल? फक्त तीन नेते घेणार शपथ

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचा गुरुवारी शपथविधी सोहळा...