spot_img
अहमदनगरनगरमध्ये कुस्त्यांची दंगल!; कुस्तीगीरांचे अहिल्यानगरीत आगमन

नगरमध्ये कुस्त्यांची दंगल!; कुस्तीगीरांचे अहिल्यानगरीत आगमन

spot_img

राज्यातून कुस्तीगीरांचे अहिल्यानगरीत आगमन | इन कॅमेरा पैलवानांचे वजन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री :-
जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. वाडियापार्क मैदानावर उभारण्यात आलेल्या कै.बलभीमआण्णा जगताप क्रीडानगरीमध्ये भव्य व आकर्षक व्यासपीठ, प्रवेशद्वार तसेच चार आखाड्यांसाठी रेसलिंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आले आहे. प्रवेशद्वार व व्यासपीठास खास शिवकालीन स्वरूप देण्यात आले आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून नामवंत पैलवानांचे आगमन नगर शहरात होण्यास आज सकाळ पासून सुरवात झाली आहे. त्यांचे वजना प्रमाणे इन कॅमेरा गट तयार करण्याच्या कामासही सुरवात झाली आहे. आज दुपारनंतर माती व गादी दोन्ही प्रकारात कुस्त्यांच्या थारारास सुअर्वात होणार आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा.डॉ.संतोष भुजबळ यांनी दिली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या क्रीडानगरीमध्ये 100 बाय 45 फुटाचे किल्ल्‌‍याच्या बुरुजाच्या प्रतिकृतीचे भव्य व्यासपीठ उभारले आहे. त्यावर पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांची पूर्णाकृती प्रतिमा तसेच जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे पोट्रेट लावले आहेत.

मैदानात चहूबाजूला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह स्पर्धेचे संयोजक आ.संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे यांचे पोस्टर लावले आहेत. मुख्य व्यासपीठावर 100 प्रमुख पाहुण्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य व्यासपीठा शेजारी दोन व्हीआयपी व्यासपीठ उभारण्यात आले असून त्या ठिकाणी प्रत्येकी 50 व्हीआयपींची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेज समोरील रेसलिंग प्लॅटफॉर्मवर मातीचे व गादीचे चार आखाडे तयार करण्यात आले असून त्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै. अशोक शिर्के व पै. अर्जुन शेळके यांनी दिली.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. व्यासपीठ परिसरात पास धारक व्यक्तीलाच प्रवेश देण्यात येणार आहे. येथे तातडीची वैद्यकीय उपचार सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरीत आसन व्यवस्था करण्यात आली असून आखाड्यांमध्ये होणाऱ्या कुस्त्या व्यवस्थित पाहता याव्यात यासाठी जागोजागी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यता आली आहे, अशी माहिती कार्यालयीन सचिव निलेश मदने यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...