spot_img
अहमदनगरAhmednagar NewsToday: रिक्षा चालकांचा संप! विद्यार्थी, नागरिकांचे हाल, नेमकी मागणी काय? पहा..

Ahmednagar NewsToday: रिक्षा चालकांचा संप! विद्यार्थी, नागरिकांचे हाल, नेमकी मागणी काय? पहा..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
रिक्षा चालकांच्या दंडाची रक्कम रद्द करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालकासह खासदार नीलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या दिला. परिवहन विभागाने ५० रुपये रोज दंडाची रक्कम तातडीने रद्द करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

रिक्षा चालकांची आर्थिक लुट थांबवावी व इतर मागण्यांसाठी शहरातील जिल्हा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हधिकारी यांना निवेदन देण्यात आले. रिक्षा चालकांच्या मोर्चामध्ये खासदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप यांच्यासह रिक्षा चालक मोठ्या संख्याने सहभागी झाले होते.

दरम्यान माळीवाडा बस स्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, न्यू आर्टस् कॉलेज, सिव्हील हॉस्पिटल, तारकपूर ते डीएसपी चौक पासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. शहरातील ऑटोरिक्षा चालकांनी आज संप पुकारला आहे. परवाना धारक ऑटो रिक्षाना फिटनेसलेटसाठी केंद्र सरकार परिवहन विभागाने ५० रुपये रोज दंड आकारणी सुरु केली आहे. सदर निर्णय मागे घेण्याची प्रमुख मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.

दरम्यान या संपाचा फटका शाळकरी विद्यार्थी, नागरिक महिला वर्ग यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. ऑटो रिक्षा फिटनेस लेटसाठी रोजी ५० रुपये रोज दंड आकारणी सुरु केलेली आहे. ती मागे घ्यावी तसेच महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून कामकाज चालू करावे. ऑटो रिक्षाचे चालू असलेले परवाने तात्काळ बंद करावे. परवाना धारक ऑटो रिक्षासाठी आर.टी.ओ.मध्ये स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यांना आर. टी. ओ. अधिकारी कर्मचार्‍याने पासिंग व इतर कामासाठी मदत करावी, अशी मागणी रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शहर उपनगरात जाणारी रिक्षा सेवा संपूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा साहजिकच प्रवाशांना मात्र मनस्ताप सोसावा लागतोय. माळीवाडत्त बस स्टॅण्ड, नेप्ती नाका, दिल्ली गेट, सावेडी नाका, केडगाव, भिगार, एमआयडीसी, आदी भागात नागरिकांचे मोठे हाल झाले. उपनगरातून शहरात येणारे विद्यार्थी, नोकरदार वर्गांला मोठा त्रास सहन करावा लागाला. दरम्यान सिटी बसवर प्रवासी वाहतूकीचा मोठा ताण पडला असल्याचे दिसून आले. बस स्टॅण्ड, नेप्ती चौक, दिल्ली गेट, सावेडी नाका, केडगाव, भिगार, एमआयडीसी, आदी भागात नागरिकांचे मोठे हाल झाले.

खासदार, आमदार रिक्षा चालकांच्या पाठीशी
गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालकांचे प्रश्न प्रलंबित आहे. केंद्र सरकारने ऑटो रिक्षा फिटनेस लेटसाठी रोजी ५० रुपये रोज दंड आकारणी सुरु केली आहे. तो निर्णय मागे घेण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरवा करणार असल्याचे खा.नीलेश लंके यांनी यावेळी बोलतांना सांगितले. दरम्यान यावेळी आ. जगताप यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रिक्षा चालकांच्या प्रश्नसंदर्भात पाठपुरवा करत आहेत. दंडाची रक्कम तातडीने रद्द करणे गरजेचे आहे. येत्या कालावधीत रिक्षा चालकांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना रस्त्यातच उतरवले…
परवाना धारक ऑटो रिक्षाना फिटनेसलेट साठी सरकारने ५० रूपये दंडाची रक्कम ठेवली आहे. या निर्णयाविरोधात रिक्षा चालक चांगलेच आक्रमक झाले आहे. शहर व उपनगरातील काही रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. मात्र महत्वाच्या काही चौकामध्ये रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी हे सुरू असलेल्या रिक्षातून प्रवासी उतरून देत असल्याचे चित्र होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...