spot_img
अहमदनगरआमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने क्रीडा क्षेत्रात क्रांती घडणार

आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने क्रीडा क्षेत्रात क्रांती घडणार

spot_img

संग्राम चषकाचा नूरानी टायर्स संघ ठरला मानकरी तर व्हिनस स्पोर्ट ठरला उपविजेता

अहमदनगर | नगर सह्याद्री

वाडिया पार्क क्रीडा मैदानात संग्राम चषक शहरातील व जिल्ह्यातील खेळाडूंसाठी पर्वणी ठरली आहे. संग्राम चषक स्पर्धा खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ ठरत आहे. नगर शहरात खेळाडूंमध्ये चांगले वातावरण निर्माण होऊन ऋणानुबंध व गोडवा निर्माण झाला. वाडिया पार्क मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चांगले मैदान असून या ठिकाणी वर्षभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. खेळाडूंनी एकत्र येऊन संग्राम चषकचे आयोजन करत खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण केला.

क्रिक्रेटर सुनील आगरकर यांनी सर्वांना सोबत घेऊन उत्तम स्पर्धा पार पाडली. यात अंतिम सामन्यात नूरानी टायर्स संघ आणि व्हिनस स्पोर्ट यांच्यात अंतिम लढत होऊन नूरानी टायर्स संघ संग्राम चषकाचा मानकरी ठरला. उपविजेतेपद विनस स्पोर्ट संघाने पटकाविले. आमदार संग्राम जगताप यांच्या रूपाने क्रीडा क्षेत्रात क्रांती घडून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये चांगले खेळाडू निर्माण होतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी केले.

वाडिया पार्क येथे संग्राम चषक नगर चॅम्पियन लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रा. माणिकराव विधाते, वैभव ढाकणे यांच्या हस्ते झाले. यावेळी सागर मुर्तडकर, अभिजित खोसे, संतोष लांडे, वैभव वाघ, केतन क्षीरसागर, अमित खामकर, रामभाऊ घाडगे, दीपक बडे, सचिन सुसे, सुनील झिरपे, डॉ. इमरान शेख, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, संतोष उगले, भरत मामा पवार, गोरख शेवाळे, शाम पिंपळे आयोजक सुनील आगरकर, प्रकाश राठोड, विशाल तोरणे, राजू बराटे, संजीव आल्हाट आदी उपस्थित होते. प्रा. विधाते म्हणाले, क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून वाडिया पार्क मैदानात अनेक खेळाडू घडले. आ. जगताप यांच्या माध्यमातून शहरातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी आमचा प्रयत्न असतो.

नगर शहरातील खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर नाव उंचावण्याचा आमचा मानस आहे. सुनील आगरकर म्हणाले, आमदार जगताप यांच्या माध्यमातून वाडिया पार्क मैदानावर संग्राम चषक नगर चॅम्पियनशिप लीग स्पर्धेचे हे पहिले वर्ष असून ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर खेळली गेली. स्पर्धेमध्ये १४ संघ सहभागी झाले. विजेत्यांना फोर व्हीलर, टू व्हीलर गाडी बक्षीस देण्यात आले. येणार्‍या काळात यापेक्षाही चांगल्या प्रतीचे चषक आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जातील.

संग्राम चषकाचा नूरानी टायर्स संघ मानकरी ठरला तर व्हिनस स्पोर्ट उपविजेता ठरला असून तृतीय क्रमांक समर्थ ट्रेडिंग, चौथा क्रमांक वीर भगतसिंग यांना प्रदान केला. स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज अमन शेख, बेस्ट बॉलर यश कासलीवाल, बेस्ट बॅटमॅन सुनील आगरकर, फायनल मॅन ऑफ द मॅच सचिन झिने, स्पर्धेतील शिस्तबद्ध खेळाडू प्रमोद घाडगे यांना गौरवण्यात आले. प्रथम क्रमांक टीमला अल्टो फोर व्हीलर व एक लाख रुपये रोख पारितोषिक, द्वितीय क्रमांक टीमला पल्सर टू व्हीलर व ७१ हजार रुपये रोख पारितोषिक, तृतीय क्रमांक टीमला शाईन गाडी ५१ हजार रुपये रोख पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांक टीमला शाईन गाडी व ३१ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...