spot_img
अहमदनगरदिवाळीनंतरच निवडणुकांचे फटाके! महापालिकांच्या प्रभागरचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला अंतिम प्रभागरचना

दिवाळीनंतरच निवडणुकांचे फटाके! महापालिकांच्या प्रभागरचनेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला अंतिम प्रभागरचना

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री:-
राज्यात मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. तीन वर्षापासून महापालिका आणि जिल्हा परिषदांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. दरम्यान, या वर्षातच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. याबाबत सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात ऑक्टोंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समित्यासोबतच 11 नगर पालिकांच्या निवडणूक झालेल्या नाहीत. जिल्हा परिषद- पंचायत समित्या आणि महानगर पालिका तसेच नगर पालिकांच्या निवडणूका स्वतंत्र झाल्यास जिल्ह्यात देखील तीन टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सुत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. नगर शहरात महापालिका, त्यानंतर संगमनेर, कोपरगाव, राहाता, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, राहुरी, पाथड, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड आणि शिड या ठिकाणी स्वतंत्रपणे तीन टप्प्यात निवडणूका होण्याची शक्यता आहे. अकोले, पारनेर आणि कर्जत नगर पालिकांची मुदत 2027 मध्ये संपणार आहे.

झेडपी गट-गण प्रभाग रचनेची नगरला होणार तपासणी
होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गणाच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाच्या आदेशानूसार प्रत्येक तालुक्यात प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. तयार करण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गणांची शुक्रवारपासून नगरला तपासणी करण्यात येणार आहे. 27, 28 आणि 30 जून जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकानिहाय या प्रारूप प्रभागाची रचना तपासून त्यानंतर त्यांची घोषणा करण्यात येणार आहे. यामुळे एका प्रकारे गट आणि गणाची प्रभाग रचना करतांना जिल्हा प्रशासन दक्षता घेतांना दिसत आहे. दरम्यान, साधारण दिवाळीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. त्याद़ृष्टीने राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभागाच्यावतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी 10 जून रोजी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने आदेश काढण्यात आले. या आदेशानंतर तयार करण्यात प्रारूप प्रभाग रचनेबाबत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आदेश काढत निवडणुकीसाठी नव्याने गट आणि गणांची प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले.

मनपा, नगर पालिका प्रभाग रचनेसाठी सुधारित कार्यक्रम
नगरविकास विभागाने अहिल्यानगर महापालिका व जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 11 नगर पालिका व एका नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा सुधारीत कार्यक्रम सोमवारी जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर 3 सप्टेंबरला महानगरपालिकेची, तर 18 ऑगस्टला नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर हरकती व सुनावणी होऊन 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान महानगरपालिकेची, तर 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. शासनाने 12 जून रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अहिल्यानगर महापालिका व जिल्ह्यातील रिक्त असलेल्या नेवासा नगरपंचायत, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहता, शिड, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथड, श्रीगोंदा, शेवगाव, जामखेड या नगरपालिका रिक्त आहेत. त्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात आता बदल करण्यात आला असून, शासनाने सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मैं समंदर हूँ, मै लौटकर वापस आयुंगा!; डॉ. सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याने पारनेरच्या राजकारणात पुन्हा नवा ट्वीस्ट..

विधानसभेची पुनरावृत्ती होण्याचे संकेत | जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुजय विखे यांनी कसली पारनेरमध्ये कंबर राळेगण...

मोठी कारवाई! ४ वाळूतस्कर अडकले जाळ्यात; प्रवरा नदीपात्रात ‘असा’ लावला सापळा, जेसिबीने भरलेला ट्रॅक्टर, डंपर हायवा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) येथे प्रवरा नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा...

सागर भिंगारदिवेसह साथीदारांवर गुन्हा दाखल! जामिनानंतर ‘ते’ प्रकरण भोवले…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर सागर उत्तम भिंगारदिवे (रा.केडगाव, अहिल्यानगर) याने 70...

मोकळ्या जागेत मर्डर!; पोलिसांचा तपास सुरु, सकाळी-सकाळी उपनगरात काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव उपनगरातील बुलेट शोरूमच्या मागील मोकळ्या जागेत रविवारी (22 जून 2025)...