मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून आता खातेवाटपही अंतिम झाले झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे. त्यात भाजपाच्या कोट्यातील महसूल खाते पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबर रोजी नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कोणते खाते कोणाला मिळणार याची उत्सुकता नवीन झालेला सर्वच मंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. नुकत्याच हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार खातेवाटपचा तिढा जवळपास सुटला असून काही खात्यांवर अजूनही चर्चा सुरू आहे.
मात्र काही खातेवाटप झाले असून यामध्ये प्रामुख्याने महसूल विभाग हा पुन्हा एकदा भाजपकडे आला असून महसूल मंत्री म्हणून पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्ह्याचे शिड राहता मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात महसूल मंत्र्यांची माळ पडणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. मात्र गृह, अर्थ याबाबत अजूनही चर्चा सुरू असून गृहखाते भाजप आपल्याकडे राहील आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देतील आणि नगर विकास पुणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल अशीही सूत्रांची माहिती आहे.
कोणाला कोणते खाते मिळणार
चंद्रशेखर बावनकुळे (उर्जा), राधाकृष्ण विखे पाटील (महसूल), हसन मुश्रीफ (कृषी), चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्रशिक्षण), गिरीश महाजन (आरोग्य व कुटुंब कल्याण), दत्ता भरणे (अन्न व नागरी पुरवठा), आदिती तटकरे (महिला व बालकल्याण), गुलाबराव पाटील (जलसंपदा), गणेश नाईक (कामगार), दादा भुसे (पर्यावरण), संजय राठोड (आदिवासी विकास), धनंजय मुंडे (सहकार व वस्त्रोद्योग), मंगलप्रभात लोढा (गृहनिर्माण), उदय सामंत (उद्योग विभाग), जयकुमार रावळ (पर्यटन व सांस्कृतिक), पंकजा मुंडे (सामाजिक न्याय), अतुल सावे (अल्पसंख्याक विकास), अशोक उईके (पशुसंवर्धन), शंभूराज देसाई (सार्वजनिक बांधकाम), राज्यमंत्री व त्यांचे खाते – माधुरी मिसाळ (कृषी व संशोधन), आशिष जयस्वाल (ऊर्जा), पंकज भोयर (नगरविकास), मेघना बोडकर साकोरे (जलसंपदा), इंद्रनील नाईक (शालेय शिक्षण), योगेश कदम (पशुसंवर्धन व दुग्ध विकास).