spot_img
देशभारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला?, वाचा 'ऑपरेशन सिंदूर' ची कहाणी

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला?, वाचा ‘ऑपरेशन सिंदूर’ ची कहाणी

spot_img

Operation Sindoor: पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना जीव गेला. या भ्याड हल्ल्यानंतर भारताने “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला चढवला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर भारताने आज मध्यरात्री हल्ले आहेत.

या कारवाईला भारताकडून थेट आणि योग्य प्रतिसाद मानलं जातंय. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अनेक पर्यटक आणि नवविवाहित जोडप्याचा समावेश होता. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर हे नाव राष्ट्रीय शोक आणि सूडाचे प्रतीक आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ हे नाव निवडण्यात आलंय. या कारवाईद्वारे भारत सरकारकडून पाकड्यांना हा संदेश देण्यात आला आहे की, दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर आणि हवाई दल यांनी दोघांनी मिळून ही कारवाई केली. एकूण ९ दहशतवाद्यांचे तळ यावेळी टार्गेटवर ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४ पाकिस्तानात आणि ५ पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. दरम्यान ज्या ठिकाणी हल्ले झाले त्यात बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट या शहरांचा समावेश आहे. या हल्ल्यांनंतर, पाकिस्तानने आपल्या हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवलंय. याशिवाय इशारा दिला आहे की, ते स्वतःच्या इच्छेनुसार, वेळेनुसार आणि योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देतील.

१. टार्गेटेड मोहिम
भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केले. ज्यामध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्यापत जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. जिथून संपूर्ण दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले होते. तेच दहशतवादी तळ उडवून दिले आहे.

२. ९ दहशतवादी तळांना लक्ष्य
भारताने या कारवाईत एकूण ९ दहशवतादी तळांना लक्ष्य केले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूर, मुरीदके ते चक आमरु या ठिकाणांचा समावेश आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरला आहे.

३.संयमाने शत्रूवर हल्ला
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले नाही. फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानला पुन्हा त्याची जागा दाखवून दिली आहे. याबाबत एका मीडिया हाऊसने माहिती दिली आहे.

४. जेएफ- 17 उडवले
भारताने ऑपरेशन सिंदूर करुन संपूर्ण देशाला चकित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानचे JF-17 विमानपाडले आहे.

५. तिन्ही सैन्यदलांचे एकत्रित ऑपरेशन
भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी एकत्र येऊन हे ऑपरेशन केले आहे. भारतीय आर्मी, नौदल आणि हवाई दलांनी अचून शस्त्रांचा वापर करुन ही कारवाई केली आहे. भारताने कामिकाझे ड्रोनचा वापर केला आहे.

६. पंतप्रधान मोदींचे लक्ष
आज होणाऱ्या मॉक ड्रिलवर पंतप्रधान मोदींनी लक्ष ठेवले होते. परंतु त्यापूर्वीच भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन मोठा धक्का दिला आहे. भारताच्या या कडक कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

७. संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारत माता की जय असं त्यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादमध्ये अंधार पसरला आहे.

8. जैशला मोठा धक्का
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने जैश ए मोहम्मदला मोठा धक्का दिला आहे. भारतीय विमानांनी जैश ए मोहम्मदचा अड्डा उद्धवस्त केला आहे.

9. तीन नागरिक ठार
भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्यानेदेखील हल्ला केला. यात तीन नागरिक ठार झाले आहे. यामध्ये अंधाधुं गोळीबार करण्यात आला आहे. त्यामध्ये तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

10.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?
अमेरिकेनेही भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आम्हाला माहित होते काहीतरी मोठे घडणार आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकव्यापत जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट झाल्याचे स्पष्ट ऐकून येत आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भारत कोणाची छेडखानी करत नाही, जर केली तर….; ‘ऑपरेशन सिंदूर’वर अण्णा हजारे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला चढवला....

हवामान खात्याची मोठी अपडेट!, राज्यातील ‘या’ भागात गारपीट होणार?

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातील काही भागांना या...

‘ऑपरेशन सिंदूर’! पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘भारतीय लष्कराचा..’

Operation Sindoor: भारताच्या तिन्ही दलांनी मध्यरात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या...

जल्लोष करून ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ला नगरकरांची मानवंदना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारताने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याचे सर्वत्र...