अहमदनगर। नगर सहयाद्री :-
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी खुर्द येथील शनिशिंगणापूर फाट्यावर काल दुपारच्या सुमारास मायलेेकाच्या मारहाणीत सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुखदेव किसनराव गर्जे ( वय 68 वर्ष, रा. अकोला, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर )असे मृत सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याचे नाव आहे.
राहुरी खुर्द येथील शनिशिंगणापूर फाट्यावर २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता सदरची घटना घडली सुखदेव गर्जे यांना एका महिला आणि तरुणाने मारहाण केली. मारहाणीत गर्जे हे खाली पडले. त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पण वैद्यकीय अधिकार्यानी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एक महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेतले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल असून अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.