spot_img
अहमदनगरसेवानिवृत्त अधिकाऱ्याला 18 लाखांला फसवले; वाचा, अहिल्यानगर क्राईम

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 18 लाखांला फसवले; वाचा, अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
रेल्वे खात्यात मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकाऱ्याची 18 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सेवानिवृत्त अधिकारी विजय वामन केळगंद्रे (वय 60, रा. संतोष रेसिडेन्सी, सारसनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी अनिल भास्कर पडघलमल (रा. राहुरी), संतोष चंद्रकांत कटारे (रा. कल्याण, ठाणे), सुकुमार पवार (रा. बारागाव नांदुर) तसेच तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादी सेवानिवृत्त अधिकारी केळगंद्रे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मुलीसाठी रेल्वे खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी बनावट रेल्वे नियुक्ती पत्र देण्यात आले आणि 17 ते 29 ऑगस्ट 2025 दरम्यान वाडिया पार्क (अहिल्यानगर), मुंबईतील व्ही.टी. स्टेशन परिसरातील शेर-ए-पंजाब हॉटेल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ या ठिकाणी 18 लाख रुपये स्वीकारले, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल शिंदे करत आहे. पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या बनावट नोकरीच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेंडी रोडवरील शोरूम फोडले
शेंडी रोडवरील जीप मोटर्सचे शोरूम फोडल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी घडली. तब्बल २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रशिद सय्यद (वय २६, जनरल मॅनेजर, रा. फकीरवाडा, डीएसपी चौक) यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात इसमाने शोरूमचा काचेचा दरवाजा आणि कुलूप तोडून प्रवेश केला. १ लाख ३० हजार रुपयांचा एचपी कंपनीचा लॅपटॉप, २५ हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल, तसेच रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणाचा पुढीलत पास सपोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ एस. के. पवार आणि पोहेकॉ देमकर करत आहे.

सामाजिक संघटनांची फेसबुक पोस्टवर बदनामी
एका सामाजिक संघटनेची बदनामी करणारी आणि सामाजिक तणाव निर्माण करणारी फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी फिर्यादी निशांत सुदाम नन्नवरे (वय 42, रा. लक्ष्मीनगर, भिंगार) यांच्या तक्रारीवरून राहुल मखरे याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 30 ऑगस्ट 2025 रोजी घडली. आरोपी राहुल मखरे याने फेसबुक पोस्ट करत एक प्रसिद्द सामाजिक संघटना आरक्षण आंदोलनाला बदनाम करू शकते, माझ्याकडे अशा दोन घटनांचे पुरावे आहेत. अशी पोस्ट केल्यामुळे समाजात शत्रुत्व, द्वेष आणि दंगलसदृश वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, असा आरोप फिर्यादीने केला आहे. या तक्रारीवर 4 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सपोनि जगदिश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गजेंद्र इंगळे आणि मपोहेकॉ जे. एस. फुंदे तपास करत आहेत. पोलीस प्रशासनाची सोशल मीडियावर कडक नजर असून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दर्गादायरा परिसरात महिलेवर हल्ला
दर्गादायरा परिसरात एका ३५ वर्षीय महिलेवर चार जणांनी हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात समरीन शेख, मसुद शेख, राजू शेख आणि एजाज शेख (सर्व रा. आबदी मंडी, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना २ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता फिर्यादीच्या घरामागील मोकळ्या जागेत घडली. वरील आरोपींनी फिर्यादी महिलेला शिव्या देत मारहाण केली तसेच घटनेमध्ये गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जगदिश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जे. एस. फुंदे, पोहेकॉ आय. आय. पठाण करत आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागपूर / नगर सह्याद्री - खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण...

मुंबई हायअलर्टवर! गणपती विसर्जनाआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी ; ३४ मानवी बॉम्ब अन आरडीएक्स…

मुंबई / नगर सह्याद्री - मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात...

‌’अजित पवार चोरांचे सरदार‌’; कोणी केला आरोप?, वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका पोलीस अधिकारी महिलेला फोनवरून तंबी...

शहरातील वाहतुकीत बदल, जड वाहनांना दिवसा प्रवेश बंद, वाचा पर्यायी मार्ग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील वाढत्या जड वाहन वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण...