spot_img
अहमदनगर'सातवा वेतन आयोगचा प्रश्न मार्गी लावा', कोणी केली मागणी पहा..

‘सातवा वेतन आयोगचा प्रश्न मार्गी लावा’, कोणी केली मागणी पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
अहमदनगर महानगरपालिका कर्मचार्‍यांचा अनेक वर्षाचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित असून तो येत्या १५ ऑगस्ट पर्यंत मार्गी न लागल्यास अहमदनगर मनपा कर्मचारी युनियन चे पदाधिकारी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अध्यक्ष जितेंद्र सारसर यांनी दिला.

अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न मार्गी लावल्याबद्दल प्रभाग समिती क्रमांक १ सावेडी आरोग्य विभागाच्या वतीने पदाधिकार्‍यांच्या कार्यक्रामात बोलत होते. यावेळी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल व जितेंद्र सारसर, सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष नंदकुमार नेमाने, कार्याध्यक्ष राहुल साबळे, महादेव कोतकर, उपाध्यक्ष अमोल लहारे, भास्कर अकुबत्तीन, सागर सालुंके, प्रभाग अधिकारी शाम गोडळकर ,आदींसह आयोजक राजकुमार सारसर, भाऊ वैराळ, प्रशांत रामदीन, परीक्षित बिडकर, रणजीत सारवान, संदीप चव्हाण, गोरक्षनाथ देठे, संजय चाबुकस्वार, रविंद्र वाघमारे, राजेंद्र शिंदे, सुभाष वाघमारे आदी उपस्थित होते.

बाबासाहेब मुदगल म्हणाले की, मनपा युनियन आणि कर्मचारी हे एका कुटुंबातील असून आपण सर्वजण मिळून मनपाच्या माध्यमातून नगरकरांची सेवा करू त्यांना अधिक-अधिक चांगल्या सुविधा देऊ व महापालिकेचा नावलौकिक वाढवू आरोग्य विभागातील बहुतांश कर्मचार्‍यांचे प्रमोशन झाले आहे. त्याबद्दल आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी पदाधिकार्‍यांचा सत्कार केला आहे असे ते म्हणाले.

सचिव वायकर म्हणाले, मनपा कर्मचार्‍यांनी एकजूट असणे गरजेचे आहे. त्यांनी देखील पुढे येऊन युनियनच्या माध्यमातून कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी. कर्मचार्‍यांचे विविध प्रश्न प्रलंबित होते ते मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले. त्यांला यश देखील आले आहेत. सातवा वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. तो सोडवण्यासाठी आमचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; कुठे घडली घटना?

संगमनेर । नगर सहयाद्री:- शेतातील बागेत डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना...

अहिल्यानगर: वेटरने घेतला हॉटेलमध्ये गळफास; कारण आलं समोर..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- पती-पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नी रागाच्या भरात घरातून बाहेर निघून...

आजचे राशी भविष्य! चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...