spot_img
अहमदनगरआरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

spot_img

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जानेवारी महिन्यात होवू घातलेल्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शासन आदेशानुसार महापालिका प्रशासनाकडून लोकसंख्येनुसार आरक्षित जागांची संख्या निश्चित झाली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महापालिका कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे.

17 नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहेत. 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे.मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 प्रभागांतील 68 जागांपैकी 18 जागा ओबीसी, 9 अनुसूचित जाती, तर 1 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे.

यात प्रत्येक प्रभागात एक जागा 17 ओबीसींसाठी राहणार आहे. उर्वरित एका ओबीसी जागेसाठी सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आरक्षित प्रभाग वगळून एका प्रभागात दोन ओबीसी उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रभागापासून उतरत्या क्रमाने आरक्षित सदस्यसंख्येइतक्या प्रभागात आरक्षण प्रस्तावित केले आहे. एकूण 68 सदस्यांपैकी 27 टक्के म्हणजेच 18 जागांवर ओबीसींना संधी मिळणार आहे.

शहरात 17 प्रभाग असल्याने प्रत्येक प्रभागात एक व आणखी एका प्रभागात ओबीसी प्रवर्गासाठी दोन जागा असणार आहेत. एकूण 68 पैकी 34 जागांवर महिला आरक्षण असेल. यात अनुसूचित जाती प्रवर्गात 5, ओबीसी प्रवर्गात 9 व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 20 जागा असणार आहेत. मागील निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 19 जागा होत्या. यंदा अनुसूचित जमातीसाठी महिला आरक्षण नसल्याने सर्वसाधारण महिला प्रवर्गात एक जागा वाढणार आहे. 68 पैकी 20 जागा खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गाच्या असणार आहेत. ओबीसीसाठी प्रत्येक प्रभागात एक जागा आरक्षित राहणार आहे. त्यात उर्वरित एका जागेसाठी सोडत काढण्यात येणार आहे

महिला आरक्षणाकडे लक्ष
प्रभाग 1, 2, 5, 8, 9, 13, 15, 16, 17 या प्रभागांमध्ये एक जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. त्यांतील पाच जागांवर महिलांसाठी आरक्षण असेल. तर, प्रभाग सातमध्ये एक जागा अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. आता या सर्व प्रक्रियांत महिला आरक्षण कोणत्या प्रभागात पडणार यावर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे; कारण हे आरक्षण निश्चित झाल्यानंतरच उमेदवारांची पुढील रणनीती ठरणार आहे. आरक्षणानंतरच पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरु होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

जैन मंदिर ट्रस्ट प्रकरण: धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कोतवालीत तक्रार

जैन मंदिर ट्रस्ट प्रकरणी काळे, गुंदेचा यांनी दिली तक्रार अहिल्यानगर | नगर सह्याद्री श्री ऋषभ संभव...