spot_img
देशरिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १०० आणि २०० च्या नव्या नोटा लॉन्च करणार!,...

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १०० आणि २०० च्या नव्या नोटा लॉन्च करणार!, जुन्या नोटा…

spot_img

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. १०० आणि २०० रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता १०० आणि २०० रुपयांच्या नोटा बदलण्यात येणार आहेत. त्या लवकरच चलनात सक्रिय होणार आहे.

आता १०० आणि २०० रुपयांच्या नोटांवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे. त्यानंतर आता नोटा लाँच केल्या जाणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने निवेदन जारी केले आहेत. या नवीन नोटांची रचना ही महात्मा गांधी यांच्या सीरीजमधील नोटांसारखीच असणार आहे.

रिझर्व्ह बँकेने पूर्वी जारी केलेल्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन म्हणून चालू राहतील. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे. या नोटांची डिझाइन ही जुन्या सीरीजनुसार असणार आहे. या नवीन नोटांचे रंग, पॅटर्न सर्वकाही सारखे असणार आहे. जुने १०० ते २०० रुपये मान्य असणार आहे. अशा १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा चलनात येणार आहे.

मात्र, जुन्या १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचं काय होणार याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जुन्या नोटा या चलनात सक्रिय राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही या नोटा वापरु शकतात. याचसोबत ५० रुपयांच्या नोटांवरदेखील गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...