गणेश जगदाळे | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली असून, यामुळे तालुक्याच्या राजकीय वातावरणात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली 13 ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या या सोडतीने विविध गट आणि गणांसाठी आरक्षण निश्चित केले आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले असून, येत्या काही दिवसांत निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
जवळा जिल्हा परिषद गट
जवळा जिल्हा परिषद गटात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पुरुष उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीकडून डॉ. श्रीकांत पठारे, मारुती रेपाळे आणि दीपक लंके यांनी दावेदारी सादर केली आहे, तर महायुतीकडून विश्वनाथ कोरडे, सुजित झावरे आणि सतीश पिंपरकर यांनी रिंगणात उडी घेतली आहे.
जवळा गण
जवळा गणात महिला सर्वसाधारण जागेसाठी महाविकास आघाडीकडून राजेश्वरी कोठावळे, दर्शना जितेश सरडे आणि सुनीता आबासाहेब खोडदे यांनी तयारी केली आहे, तर महायुतीकडून सोनाली सालके आणि वैशाली पिंपरकर यांनी उमेदवारीसाठी पुढाकार घेतला आहे.
कान्हूरपठार गण
कान्हूरपठार गणात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सर्वसाधारण जागेवर महाविकास आघाडीकडून किरण ठुबे, चंद्रभान ठुबे आणि प्रसाद नवले यांनी दावेदारी केली आहे, तर महायुतीकडून बाळासाहेब रेपाळे, अनिल देठे आणि अर्जुन नवले यांनी आव्हान उभे केले आहे.
सुपा जिल्हा परिषद गट
सुपा जिल्हा परिषद गटात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला जागेसाठी महाविकास आघाडीकडून राणी निलेश लंके आणि जयश्री सचिन पठारे, राजेश्वरी दत्तात्रय कोठवळे-दिवटे, सुवर्णा घाडगे यांनी रिंगणात उतरायचे ठरवले आहे, तर महायुतीकडून सुषमा गणेश शेळके, निर्मला सुनील थोरात, सुषमा रावडे आणि आश्विनी थोरात यांनी तयारी दाखवली आहे.
सुपा गण
सुपा गणात महिला सर्वसाधारण जागेसाठी महाविकास आघाडीची सुरेखा सचिन पवार, उमेदवार आहेत. तर महायुतीकडून प्रियांका राहुल शिंदे आणि मनीषा योगेश रोकडे यांनी दावेदारी सादर केली आहे. वाडेगव्हाण गणात अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण जागेसाठी महाविकास आघाडीकडून बाळासाहेब सोनवणे यांनी पुढाकार घेतला आहे, तर महायुतीकडून राजेंद्र उबाळे आणि डॉ. धनंजय पोटे यांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला जागेसाठी महाविकास आघाडीकडून सोनिया रविंद्र राजदेव आणि अरुणा गंगाराम बेलकर यांनी उमेदवारीसाठी पावले उचलली आहेत, तर महायुतीकडून अर्चना दिलीप दाते आणि सुप्रिया वसंतराव झावरे, सुप्रिया राहुल जाधव यांनी आव्हान दिले आहे.
टाकळी ढोकेश्वर गण
टाकळी ढोकेश्वर गणात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिला जागेसाठी महाविकास आघाडीकडून अरुणा खिलारी, उज्वला रोकडे आणि सुनीता जयसिंग झावरे अर्चना शरद गागरे यांनी दावेदारी केली आहे, तर महायुतीकडून सविता सुजित झावरे, प्रतिभा खिलारी आणि सुमन सैद, यांनी रिंगणात प्रवेश केला आहे.
कर्जुले हर्या गण
कर्जुले हर्या गणात सर्वसाधारण जागेवर महाविकास आघाडीकडून प्रकाश गाजरे, शिवाजी बेलकर, अशोक घुले आणि रवींद्र राजदेव यांनी उमेदवारीसाठी पुढाकार घेतला आहे, तर महायुतीकडून संतोष शेलार, देवराम मगर, धनंजय निमसे यांनी दावेदारी सादर केली आहे.
ढवळपुरी जिल्हा परिषद गट
ढवळपुरी जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला जागेसाठी महाविकास आघाडीकडून लीलाबाई रोहकले, सुनंदा सुरेश धुरपते आणि स्नेहा झावरे यांनी तयारी दाखवली आहे, तर महायुतीकडून सविता सुजित झावरे, सुमन बाबासाहेब तांबे, ताराबाई पोपट चौधरी, आणि रिंकू सुभाष सासवडे यांनी रिंगणात उतरायचे ठरवले आहे.
भाळवणी गण
भाळवणी गणात सर्वसाधारण जागेसाठी महाविकास आघाडीकडून संदीप रोहकले, बाबाजी तरटे, अभयसिंह नांगरे आणि बबलू रोहकले यांनी दावेदारी केली आहे, तर महायुतीकडून हरिष दावभट, सुभाष दुधाडे आणि आण्णा नरसाळे यांनी आव्हान उभे केले आहे. ढवळपुरी गणात अनुसूचित जमातीच्या महिला राखीव जागेसाठी महाविकास आघाडीकडून जनाबाई राजू पथवे यांनी उमेदवारीसाठी पुढाकार घेतला आहे, तर महायुतीकडून लिलाबाई होनाजी घोगरे आणि लहानूबाई नामदेव गांगुर्डे यांनी दावेदारी सादर केली आहे.
निघोज जिल्हा परिषद गट
निघोज जिल्हा परिषद गटात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुष जागेसाठी महाविकास आघाडीकडून डॉ. भास्कर शिरोळे, खंडू भूकन आणि वसंत कवाद यांनी रिंगणात उतरायचे ठरवले आहे, तर महायुतीकडून सचिन वराळ पाटील आणि सुधामती कवाद यांनी आव्हान दिले आहे.
निघोज गण
निघोज गणात सर्वसाधारण जागेसाठी महाविकास आघाडीकडून ठकाराम लंके आणि अनिल शेटे यांनी दावेदारी केली आहे, तर अपक्ष उमेदवार रुपेश ढवण आणि महायुतीकडून पंकज कारखिले यांनी रिंगणात प्रवेश केला आहे. अळकुटी गणात महिला सर्वसाधारण जागेसाठी महाविकास आघाडीकडून कोमल भंडारी, कांचन दत्तात्रय म्हस्के आणि अर्चना बाळासाहेब पुंडे यांनी तयारी दाखवली आहे, तर अपक्ष उमेदवार प्रमिला खंडू म्हस्के आणि महायुतीकडून धनश्री दिनेश बाबर, जान्हवी भास्कर उचाळे यांनी उमेदवारीसाठी पुढाकार घेतला आहे.
ग्रामीण भागातील राजकारणात जोरदार हालचाली
या आरक्षण सोडतीमुळे पारनेर तालुक्यातील ग्रामीण राजकारणात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील उमेदवारांनी आपापल्या गट आणि गणांमध्ये प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही रिंगणात उतरून निवडणुकीत रंगत आणली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, 3 नोव्हेंबरपर्यंत अंतिम आरक्षण जाहीर होईल. उमेदवारांनी नामांकनाची तयारी सुरू केली असून, स्थानिक मुद्द्यांवर आधारित प्रचाराला लवकरच वेग येण्याची शक्यता आहे. ही निवडणूक पारनेर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार असून, येत्या काही आठवड्यांत येथील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल.