spot_img
अहमदनगरपारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पारनेर येथील इंदिरा भवन सभागृहात तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये अनुसूचित जातींसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 8, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 31 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 69 सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेत.

आरक्षण सोडतीनंतर निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार असून, राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.तालुक्यातील निघोज, भाळवणी, लोणी हवेली, वडगाव आमली, म्हसणे, म्हस्केवाडी आणि गुणोरे या मोठ्या आणि महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. यामुळे या गावांमधील इतर प्रवर्गातील इच्छुकांमध्ये निराशा पसरली आहे, कारण केवळ अनुसूचित जमातीतील उमेदवारच निवडणूक लढवू शकतील. सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या टक्केवारीच्या आधारावर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

तसेच, ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण जागांपैकी 50% जागा महिलांसाठी आरक्षित असून, अनुसूचित जाती आणि जमातीच्या सरपंच पदांमध्येही 50% महिला आरक्षण लागू होईल.जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या 17 एप्रिल 2025 च्या आदेशानुसार, म्हसे खुर्द, वडनेर हवेली आणि राळेगण थेरपाळ या ग्रामपंचायतींचे सरपंच पदांचे आरक्षण मार्च 2020 ते मार्च 2025 या कालावधीतील आरक्षणानुसार झालेले नसल्याने विशेष निर्देश देण्यात आले. त्यानुसार, म्हसे खुर्दचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी, राळेगण थेरपाळचे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि वडनेर हवेलीचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी कायम ठेवण्यात आले आहे.

या तीन ग्रामपंचायती वगळता उर्वरित सात ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे, ज्यामध्ये निघोज, भाळवणी, लोणी हवेली, वडगाव आमली, म्हसणे, म्हस्केवाडी आणि गुणोरे यांचा समावेश आहे.आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना पुढील प्रक्रियेसाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. यामध्ये आरक्षणाची अंतिम यादी जाहीर करणे, उमेदवारी अर्ज स्वीकारणे आणि निवडणूक कार्यक्रमाची तयारी यांचा समावेश आहे. या सोडतीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, विशेषतः मोठ्या गावांमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

काही गावांमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत असली, तरी अनुसूचित जमातीतील इच्छुकांनी उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे.तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी सांगितले की, सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली असून, पुढील टप्प्यांसाठी प्रशासन सज्ज आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी नवे सरपंच आणि सदस्य निवडले जातील, जे पुढील पाच वर्षे गावच्या विकासासाठी कार्यरत राहतील. अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठीच्या आरक्षणामुळे गावपातळीवरील नेतृत्वात विविधता येण्याची शक्यता आहे. मात्र, मोठ्या गावांमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षणामुळे काही इच्छुकांच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या, तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थानिक राजकारणामध्ये मोठी उलथा पालत
सर्वसाधारण प्रवर्गासाठी तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी, आळकुटी, कर्जुले हर्या, कान्हूर पठार, वासुंदे पिंपळगाव रोठा पोखरी पिंपरी जलसेन वाडेगव्हाण देवी भोयरे गोरेगाव दरोडी मांडवे खु. म्हसोबा झाप नारायण गव्हाण पानोली यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीला सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण निघाल्यामुळे स्थानिक राजकारणामध्ये मोठी उलथा पालत होणार असून इच्छुकांची भाऊ गर्दी आता पाहिला मिळणारा असून येणाऱ्या काळात तालुक्यातील राजकारणही तापलेले दिसणारा असून यामध्ये अनेक ग्रामपंचायत या अति संवेदनशील ग्रामपंचायती म्हणून ओळखल्या जातात.

पारनेर तालुक्यातील सरपंच पदासाठी गावनिहाय पडलेले आरक्षण खालील प्रमाणे
अनुसूचित जमातीसाठी सरपंच पदासाठी आरक्षित झालेली ०६ गावे पुढीलप्रमाणे आहेत.
पिपंळनेर- (अनुसुचित जाती), मळरूप- (अनुसुचित जाती), राजणगाव मशीद (अनुसुचित जाती), अस्तगाव-(अनुसुचित जाती), जामगाव-(अनुसुचित जाती)
किन्ही – (अनुसुचित जाती),

अनुसूचित जमातीसाठी सरपंच पदासाठी आरक्षित झालेली ०८ गावे पुढीलप्रमाणे आहेत.
म्हसे: खुद- (अनुसुचित जमाती), गुणारे – (अनुसुचित जमाती), भाळवणी -(अनुसुचित जमाती), निघोज – (अनुसुचित जमाती), लोणी हवेली- (अनुसुचित जमाती), वडगाव अमली – (अनुसुचित जमाती), म्हसणे – (अनुसुचित जमाती), म्हस्केवाडी -(अनुसुचित जमाती),

नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी सरपंच पदासाठी आरक्षित झालेली ३१ गावे पुढीलप्रमाणे आहेत.
राळेगण थेरपाल, जातेगाव, बाबूर्डी, चोंभूत, गारगुंडी , जाधववाडी, काळकूप, खडकवाडी, कुरद, पळवे.बु, पठारवाडी, पुणेवाडी, राळेगणसिद्धी, रायतले, वाघुंडे खुं, विरोली, यादववाडी,गारखिंडी, शेरीकसारे, जवळा, वडझीरे, अपधुप, वडुले, पळशी, सुपा, कारेगाव, वनकुटे, पाडली राजणगाव, गटेवाडी, भोन्द्रे, ढोकी

सरपंच पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवलेली ६९ गावे पुढील प्रमाणे आहेत.
अक्कलवाडी, अळकुटी, बाभूळवाडे, भांडगाव, भोयरे गांगर्डा, चिचोली, दैठणेगुंजाळ, दरोडी, देसवडे, देवीभोयरे, ढवळपुरी, धोत्रे बु., डिक्सळ, गांजीभोयरे, घाणेगाव, गोरेगाव, हंगा, हट्टलखिंडी, हिवरे कोरडा,कडूस,काकणेवाडी, कळस, कान्हूर,करंदी, कर्जुलेहर्या, कासारे, कातळवेढा, कोहोकडी, लोणीमावळा, मांडवे खु., मावळेवाडी, म्हसोबाझाप, मुगशी, नांदूरपठार, नारायणगव्हाण, पाडळीदर्या, पडली कान्हूर, पळसपूर, पानोली, पिपंळगाव रोठा,पिपळगावतुर्क पीप्रीगवळी,पिंप्रीजलसेन, पिंप्रीपठार, पोखरी, रांधे, रेनवाडी, रुईछत्रपती, सांघवीसूर्या, सारोळा आडवाई, सावरगाव, शहांजापूर, शिरापूर, सिद्धेश्वरवाडी, टाकळी ढोकेश्वर, तिखोल, वडगावदर्या, वडगाव सावताळ, वडनेर बु., वडनेर हवेली, वाघुंडे बु., वाळवणे, वारणवाडी, वासुंदे, वेसदरे, वाडेगव्हाण, पाबळ
पाडळी आळे, पळवे खु.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

कही खुशी, कही गम! नगर तालुक्यातील १०५ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी नगर तालुक्यातील 105 गावांची आरक्षण सोडत...