spot_img
ब्रेकिंगपंचायत समिती सभापती पदासाठी 'या' तारखेला आरक्षण सोडत

पंचायत समिती सभापती पदासाठी ‘या’ तारखेला आरक्षण सोडत

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील 13 पंचायत समिती सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या 9 सप्टेंबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार, राज्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी (या सर्व प्रवर्गातील महिलांसह) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच निर्देशानुसार ही सोडत प्रक्रिया पार पडत आहे.अकोले पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी निश्चित करण्यात आले आहे.

पंचायत समिती सभापती पदासाठी एकूण 13 पदे आरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जाती (महिला)साठी 1, अनुसूचित जमाती (महिला)साठी 1, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 2, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (महिला) 2, सर्वसाधारणसाठी 3 आणि सर्वसाधारण (महिला)साठी 3 पदे आरक्षित आहेत.नागरिकांनी या आरक्षण सोडत बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये चाललंय काय? डिलिव्हरी बॉयवर सपासप वार, वडारवाडीत राडा, मुकुंदनगरमध्ये प्राणघातक हल्ला, वाचा क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील केडगाव परिसरात घरासमोर पार्क केलेली टाटा हॅरियर गाडी रात्रीच्या...

शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; कलेक्टरांकडून ‘देऊळ कार्यालय बंद’

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले...

नगरकरांनो सतर्क राहा! जिल्ह्यासाठी यलो अलर्ट, हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2025...

मर्चंट्‌‍स बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत; सभासदांनासाठी खुशखबर, बँक काय देणार भेट?, वाचा सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या अहमदनगर मर्चंट्‌‍स बँकेला रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा...