पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. आरक्षण सोडतीमुळे काहींची मोठी अडचण झाली असून काहींनी आरक्षण जाहीर होताच प्रचाराला सुरुवात केली आहे.
जवळा आणि सुपा गण सर्वसाधारण महिला, तर कान्हूरपठार गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) आरक्षण आहे. वाडेगव्हाण गण अनुसूचित जाती (एससी-सर्वसाधारण) आणि टाकळी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव आहे. कर्जुले आणि भाळवणी गण सर्वसाधारण, तर ढवळपुरी गण अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव ठेवण्यात आले आहे.
निघोज गण सर्वसाधारण आणि अळकुटी गण महिला सर्वसाधारणसाठी राखीव आहे.
या आरक्षण सोडतीमुळे पारनेर तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट होत असून, निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. त्यामुळे गावोगावचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
असे आहे गणाचे आरक्षण
जवळा – महिला सर्वसाधारण
कान्हूरपठार गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
सुपा – महिला सर्वसाधारण
वाडेगव्हाण – अनुसूचित जाती (एससी-सर्वसाधारण)
टाकळी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कर्जुले – सर्वसाधारण
भाळवणी – सर्वसाधारण
ढवळपुरी – अनुसूचित जमाती महिला राखीव
निघोज – सर्वसाधारण
अळकुटी – महिला सर्वसाधारण