spot_img
देशRepublic Day 2024 : प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच असते !...

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच असते ! पण ‘असे’ का ? तेथेच का आयोजित होते परेड? पहा..

spot_img

दिल्ली / नगर सह्याद्री : आज 26 जानेवारी 2024 रोजी आपण आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आजच्या दिवशी देशाची राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथवर सेना एक खास परेड करते. कर्तव्य पथ की राजपथ तुम्हालाही प्रश्न पडला असेलच, तर कर्तव्य पथला आपण सुरुवातीला राजपथ या नावानं ओळखायचो. आता दरवर्षी कर्तव्य पथावरच नेहमी परेड का करण्यात येते? चला पाहुयात –

2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस मेहनत घेतल्यानंतर अखेर 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या देशाचं संविधानाला सभेनं स्विकारलं. त्यानंतर पुढच्याचवर्षी 26 जानेवारी 1950 मध्ये आपल्या देशात संविधान लागू झालं.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात कर्तव्य पथाची महत्त्वाची भूमिका आहे. या जागेला सुरुवातीला किंग्सवे नावानं ओळखायचे. हा परिसर देशाची राजधानी नवी दिल्लीचं हृदय म्हटल्या जाणाऱ्या ‘केंद्र’ म्हणजेच सेंटरवर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंग्सवेचं नाव बदलत त्याला राजपथ असं नाव देण्यात आलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या सात दशकांपर्यंत दरवर्षी येथेच प्रजासत्ताक दिना निमित्तानं कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

राष्ट्रपति भवन ते इंडिया गेटपर्यंतचा परिसर देशाच्या इतिहासात महत्त्वाच्या स्थानी आहे. ब्रिटिशांनी देशावर केलेलं राज्य ते स्वातंत्र्य हा संपूर्ण प्रवास कर्तव्य पथानं पाहिला असून या सगळ्या प्रवासाचं ते प्रतिक आहे. या कारणामुळे कर्तव्य पथावर दरवर्षी स्वातंत्र्य दिनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...