spot_img
ब्रेकिंगपारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. महायुतीनेच नगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये घोडेबाजार केल्याच्या आरोप झाल्यानंतर महायुतीच्या वतीने पारनेर शहरात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीने कशा पद्धतीने दडपशाही व दहशत वापरत नगराध्यक्ष पद मिळवले हे सांगितले आहे.

पारनेर येथे मंगळवार दि. ११ रोजी महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीत दबाव निर्माण करत व ११ नगरसेवकांना नजर कैदेत ठेवून लोकशाहीचा गळा घोटण्याचा नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महाविकास आघाडीने प्रयत्न केला. खासदार नीलेश लंके हे चुकीच्या पद्धतीने राजकारण करत असून दहशत आणि दडपशाही मार्गाने नगराध्यक्ष निवडीमध्ये व बाहेरचे लोक पाठवून दबाव गट निर्माण करून त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे.

माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांनीच महायुतीच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास लावला होता. परंतु ऐनवेळी त्यांच्यावर दबाव आल्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला असल्याचे दिसून येते. चुकीच्या पद्धतीने पारनेर नगरपंचायत मध्ये राजकारण सुरू असून विकास कामांना प्राधान्य न देता दबाव तंत्राचेच राजकारण सुरू आहे. महायुतीने घोडेबाजार केला हा आरोप अतिशय चुकीचा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.

चार ते पाच नगरसेवक महायुतीसोबत येण्यास तयार होते परंतु महाविकास आघाडीतील वरिष्ठांनी त्यांच्यावर दबाव आणल्यामुळेच त्यांनी माघार घेतली असे स्पष्ट मत नगरसेवक अशोक चेडे माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटी, नगरसेवक पै. युवराज पठारे, नवनाथ सोबले, चंद्रकांत चेडे, देवराम ठुबे, नंदू औटी, कांतीलाल ठाणगे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले आहे.

पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर पारनेर शहरातील राजकारण चांगलेच तापले असून महायुतीच्या वतीने निवड प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला आहे. सध्या पारनेर शहराच्या राजकारणावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यामुळे पारनेर शहराचे राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे.

महायुतीची सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका
पारनेर शहरांमध्ये चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका ही महायुतीची आहे. चुकीच्या पद्धतीने आरोप करून महाविकास आघाडी स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे.
युवराज पठारे (नगरसेवक, पारनेर )

धडा शिकवण्यासाठी सक्षम
पारनेर नगरपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेचाच भाग आहे. त्यामुळे हंगा किंवा राळेगणसिद्धी वरून या गावचे कारभार कोणी पाहत असेल तर त्यांना आम्ही यापुढील काळात धडा शिकवू, आमच्या गावात त्यांनी लक्ष घालण्याचा प्रयत्न करू नये पारनेर वासीय यासाठी सक्षम आहेत.
– चंद्रकांत चेडे (पारनेर)

दहशतीचे राजकारण चुकीचे
मी राष्ट्रवादी घड्याळाचा नगरसेवक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने मला बजाविलेला व्हीप मान्यच होऊ शकत नाही, मी त्यांच्या गटात बसतच नाही. मी महायुती सोबतच आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडीत पारनेर शहरात दहशत निर्माण करण्यात आली व लोकशाहीला आव्हान देण्यात आले. हे राजकारण चुकीचे आहे.
विजुभाऊ औटी (माजी नगराध्यक्ष, पारनेर )

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

दिल्लीगेट परिसरात राडा; दुचाकी फोडल्या, तरुणांना घेरलं, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दिल्लीगेट परिसरात राडा घातल्याची...