spot_img
ब्रेकिंगहुंडा घेणारा कळवा आणि ५००० रुपये मिळवा! अहिल्यानगर मधील 'या' ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत...

हुंडा घेणारा कळवा आणि ५००० रुपये मिळवा! अहिल्यानगर मधील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव

spot_img

Ahilyanagar News: नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत हुंडा घेणाऱ्यांची माहिती कळवा आणि ५००० रुपये मिळवा, अशी घोषणा करण्यात आली. वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा हुंडा बंदीचा ठराव घेतल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी दिली. तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेत असते.

त्यामध्ये शिवी बंदी, विधवा पुनर्विवाह असे वेगवेगळे महिला सन्मानार्थ, विद्यार्थ्यांच्या व गावाच्या हिताचे वेगवेगळे ठराव ग्रामपंचायत मार्फत घेतली जातात. महाराष्ट्रात गाजत असलेले वैष्णवी हगवणे प्रकरणावर चर्चा करून असे प्रकार घडू नये, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे, असे मत श्रद्धा सचिन आरगडे यांनी व्यक्त केले.

त्यावर बुधवार दि.११जून रोजी झालेल्या प्रामसभेत हुंडा घेणारा कळवा आणि ५००० रुपये बक्षीस मिळवा, असा ठराव करण्यात आला. तसेच एखाद्या कुटुंबात महिलेवर अत्याचार होत असेल याबाबत ग्रामपंचायतला कोणी पुराव्यासहित माहीती कळवली तर त्या व्यक्तीला २१०० रुपये बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहे. या ठरावामुळे आम्ही हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही अशी मानसिकता ग्रामपंचायतमार्फत गावकऱ्यांमध्ये रुजवली जाईल. तसेच सुनेला मुलगी म्हणून वागणूक मिळेल. या ठरावामुळे आनंदाचे वातावरण आहे. जणू ही एक सरपंच शरद आरगडे यांनी गावातील सुनांना /लेकींना दिलेली एक ओवाळणी आहे.

११ जणांची समिती स्थापन
ग्रामपंचायत मार्फत एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये स्वतः सरपंच अध्यक्ष व त्यांच्यासोबत इतर गावातील दहा महिला असे एकूण ११ जणांची समिती नेमण्यात आली. समितीकडे आलेली तक्रार ही हुंडा घेणे किंवा देणे यासंदर्भात किंवा कौटुंबिक हिंसाचार संदर्भात असेल तर त्या तक्रारीची समिती मार्फत शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या विश्वासकुमार यांनी सांगितलं थरारक प्रसंग…; विमान कोसळलं आणि मी सीटसह

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामधून भारतीय...

अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील किती जण दगावले? धक्कादायक आकडेवारी समोर, वाचा यादी…

  Ahmedabad Plane Crash : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या...

शनिशिंगणापूर देवस्थानचा धक्कादायक निर्णय! ‘त्या’ कर्मचाऱ्यांना डच्चू, कारण आले समोर…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानाने एक मोठा निर्णय घेत...

नगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई!, दोघांना पडल्या बेड्या, मोठ्या रक्कमेसह नोटा मोजण्याचे यंत्र जप्त

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गंजबाजार...