spot_img
अहमदनगरमेहुणीवर वारंवार अत्याचार,अहमदनगरमधील नराधम दाजीविरोधात गुन्हा दाखल

मेहुणीवर वारंवार अत्याचार,अहमदनगरमधील नराधम दाजीविरोधात गुन्हा दाखल

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री

अहमदनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेव्हणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या दाजीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला व आईला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करण्‍यात आल्‍याचा आरोप पीडितेने केला आहे. अत्याचाराच्या घटनेने पुन्हा एकदा नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नगर शहरात राहणार्‍या पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात आरोपी मेव्हण्याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिताने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 9 मे 2023 रोजी बहिणीच्या डिलिव्हरी करता मी आणि माझी आई मनपाच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात गेलो होतो. रात्री साडेआठच्या सुमारास तेथे दाजी दारू पिऊन आले व मला जिन्या जवळ असलेल्या बोळीत घेऊन गेले. तेथे त्यांनी बळजबरीने शारीरिक संबंध केले तसेच कोणाला काही सांगितले तर मला आणि माझ्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर दोन महिन्यांनी मासिक पाळी न आल्याने त्याने मला गोळ्या आणून त्या खायला दिल्याने गर्भपात झाला. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रीच्या वेळी दाजीने बहिणीला मारहाण केली.माझी आई आणि बहीण तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता, दाजी दारू पिऊन घरी आले. त्यांनी दोन वेळा बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर 24 जुलै 2024 रोजी सकाळी दहा वाजता दाजी म्हणाले की, आपण माझ्या गावी जाऊ, आम्ही दोघे दुचाकीवर बसून छत्रपती संभाजीनगर रस्त्याने शेंडी (ता. नगर) येथे गेलो. तुमचे गाव कुठे आहे असे त्याला विचारले असता त्याने दुचाकी डोंगराच्या कडेला उभी केली. माझे हातपाय बांधून बळजबरीने शारीरिक संबंध केले. कोणाला काही सांगितले तर मारून टाकीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर...

राणीताई लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?; महायुतीत एकमत होईना

तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता गणेश जगदाळे | नगर सह्याद्री विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. पारनेर...

पवारांच्या नातवाकडून कर्जत-जामखेडकरांचा भ्रमनिरास; रोहित पवारांविरोधात तरुणाई देखील एकवटली

साधा माणूस म्हणून राम शिंदेंचा मार्ग झाला अधिक सुकर कर्जत | नगर सह्याद्री पवारांचा नातू म्हणून...

जागावाटपाआधीच आघाडीत बिघाडी; काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा अर्ज…

मुंबई / नगर सह्याद्री - महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. कोणती...