spot_img
अहमदनगरAhmednagar News: लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार! कुठे घडला प्रकार?

Ahmednagar News: लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार! कुठे घडला प्रकार?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तिला मारहाणही केल्याची घटना समोर आली आहे. सिन्नर (जि. नाशिक) तालुयातील पीडित तरूणीने रविवारी (दि. २५) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या तरूणासह त्याच्या दोन मित्रांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण साहेबराव जाधव (रा. राघु हिवरे, तिसगाव, ता. पाथर्डी), गणेश पिसे, सुधीर मैड (दोघे रा. तिसगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीची प्रवीण सोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. ते दोघे फोनवर बोलत होते. त्यांची भेट झाली तेव्हा प्रवीणने माझा घटस्फोट झाला असून मला मुलबाळ नाही असे सांगून लग्न करण्याचे फिर्यादीला आमिष दाखविले होते. दरम्यान फिर्यादीच्या घरच्यांनी त्यांचे लग्न दुसर्‍या मुलासोबत ठरविल्यानंतर फिर्यादी प्रवीणसोबत नगरला निघून आली होती.

प्रवीणनने तिला मनमाड रस्त्यावरील एका फ्लॅटवर ठेवले. तेथे ते दोघे एक महिना एकत्र राहिले असता त्यांच्यात शारिरीक संबंध आले होते. ते दोघे लग्न करण्यासाठी आळंदी (जि. पुणे) येथे गेले असता प्रवीणने त्यावेळी फिर्यादीसोबत लग्न करण्यास टाळले. प्रवीणचे लग्न झाले असून तो पत्नी व मुलासह राघु हिवरे येथे राहत असल्याची माहिती फिर्यादीला मिळाली.

त्याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच प्रवीणचे मित्र पिसे व मैड यांनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर फिर्यादीला खराडी (पुणे) येथील एका रूममध्ये ठेवले. त्यानंतर देखील प्रवीणने फिर्यादीसोबत लग्न करण्यास टाळाटाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...