अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गेल्या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या विजयात केडगावच्या मतदारांचे मोलाचे योगदान होते. केडगावकरांनी दिलेल्या मतांच्या कर्जाची परतफेड विकास कामांनी केली आहे. केडगावकरांच्या आपेक्षा पूर्ण करत प्रलंबित असलेले बरेच प्रश्न व समस्या मार्गी लावल्या आहेत. त्यामुळेच केडगाव मधील प्रचाराच्या तिसऱ्या फेरीलाही नागरिकांनी उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद देत केलेल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. भविष्यात शहरासह सर्व उपनगारांच्या विकासासाठी या निवडणुकीच्या विजयासाठी सर्व जनतेच्या आशिर्वादाची व साथीची गरज मला आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी केडगाव मधील भूषणनगर परिसरात प्रचार फेरी काढून नागरिकांशी संवाद साधला. भूषण नगरमध्ये आ.जगतापांचे आगमन होताच परिसरातील नागरिकांनी त्यांना एकच गराडा घालून ढोल ताश्यांचा गजरात पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी घराघरातून महिला त्यांना औक्षण करत होत्या तर ज्येष्ठ नागरिक त्यांना आशीर्वाद देत होते. यावेळी माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेविका सविता कराळे, राजेंद्र सातपुते, साहेबराव विधाते, पंकज जहागीरदार, माऊली जाधव, सुजय मोहिते, धनंजय जामगावकर, महिंद्रा कांबळे, राहुल कांबळे, गणेश नन्नवरे, मनोज कराळे, शुभम हिंगे, सागर नाईकवाडी आदींसह मोठ्या संख्यने नागरिक, युवक उपस्थित होते.
माजी नगरसेविका सविता कराळे म्हणाल्या, आ.संग्राम जगताप यांनी केडगावच्या विकासात मोठी भर घातली आहे. आ.जगताप यांच्या सहकार्यातून लिंक रोडचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. हॉटेल अर्चना ते नेप्ती उप बाजार समिती रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. अकोळनेर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. केडगाव, भूषणनगर मधील सर्व वसाहतींमधील अंतर्गत विकासाची कामे मार्गी लवली आहेत त्यामुळेच नागरिकांनी आ,संग्राम जगताप यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. याही निवडणुकीत केडगावकरांचे पाठबळ आ.संग्राम जगताप यांच्या मागेच उभे राहणार आहे. यावेळी संतोष शेटे, कृष्णा लांडे, सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, शरद ठुबे, सुमित लोंढे, संजय लोंढे, तुषार टाक, संभाजी सातपुते, मिलिंद वर्मा, भाऊ शेटे, मयूर वर्मा, महेश गुंड, महेंद्र कांबळे, सोन्याबापु घेंबुड, राजेश भालेराव, गणेश शिंदे, पोपट कराळे, सुरज कोतकर आदी उपस्थित होते.