अहमदनगर / नगर सहयाद्री : जगदंब तरुण मंडळ व जगदंब ग्रुप व शिवमुद्रा ग्रुप केडगाव देवी यांच्या वतीने गुरुवार (दि.१४ मार्च) पासून रेणुका माता मंदिर केडगाव येथे रेणुका माता अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाची सांगता (दि.२१ मार्च )रोजी होणार आहे.
व्यासपीठ चालक रामदास महाराज क्षीरसागर तसेच बन्सी महाराज मोकाटे, मारुती महाराज चन्ने, असून भागवत कथा प्रवक्ते भाऊसाहेब महाराज पन्हाळकर (शेवगाव कांबी) हे आहेत. दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा असून, सकाळी ८ ते १२ ग्रंथराज तुकाराम गाथा व भागवत कथा, दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत असून, ५.३०ते ७ वाजता हरिपाठ तसेच रात्री ८ ते १० हरिकीर्तन होईल. त्या नंतर जागर असणार आहे.
गुरुवार (दि.१४ मार्च) रोजी योगीराज महाराज गोसावी (संत एकनाथ महाराज वंशज पैठण) यांचे तर शुक्रवार (दि.१५ मार्च) रोजी अनिल महाराज तुपे ( नाशिक), शनिवार(दि. १६ मार्च) रोजी रामेश्वर महाराज महाजन (जळगाव), रविवार (दि. १७ मार्च) रोजी वनिता प्रकाश पाटील (ठाणे), सोमवार (दि.१८मार्च) रोजी विवेकानंद महाराज शास्त्री (बीड), मंगळवार (दि.१९ मार्च) भागवत महाराज उमरेकर (वृद्धेश्वर संस्थान), बुधवार (दि. २० मार्च)रोजी शिवानंद महाराज शास्त्री (पैठण) यांचे प्रवचन होणार आहे.
गुरुवार (दि.२१ मार्च)रोजी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत बबन महाराज बहिरवाल (कडा,आष्टी) यांचे काल्याचे कीर्तन होईल. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जगदंबा तरुण मंडळ व जगदंबा ग्रुप तसेच शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे.