spot_img
ब्रेकिंग'श्री मार्कण्डेय मंदिराच्या नूतन ट्रस्टच्या कार्यकारणीचा धडाडीचा निर्णय'; अनेक दशकांपासून रखडलेल्या 'या'...

‘श्री मार्कण्डेय मंदिराच्या नूतन ट्रस्टच्या कार्यकारणीचा धडाडीचा निर्णय’; अनेक दशकांपासून रखडलेल्या ‘या’ कामास सुरवात

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री मार्कण्डेय मंदिराच्या जीर्णोद्धारास अखेर सुरवात झाली आहे. गेल्या अनेक दशकांपासून या शतकोत्तर ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अनेकदा प्रयत्न झाले. मात्र यश आले नाही. मात्र नुकतीच निवड झालेल्या श्री मार्कण्डेय देवस्थान ट्रस्टच्या नूतन कार्यकारणीने धडाडीने व तातडीने निर्णय घेत मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रत्यक्ष कामास सुरवात केली आहे. श्री मार्कण्डेय मंदिर देवस्थान ट्रस्टचे नूतन अध्यक्ष श्रीकांत छिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम व माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पहाटे 5 च्या शुभमुहूर्तावर मंदिराच्या जीर्णोद्धारास सुरुवात होऊन मंदिराचा जुना सभामंडप पाडण्याच्या कामास सुरवात झाली आहे.

यावेळी श्री मार्कण्डेय मंदिर देवस्थान ट्रस्ट, पद्मशाली पंचकमिटी ट्रस्टचे विश्वस्त व पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. बुधवारी पहाटे मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ झाल्याची वार्ता पद्मशाली समाजात वाऱ्यासारखी पसरली.त्यामुळे भाविकांची स्वप्नपूर्ती पूर्णत्वास येत असल्याने भाविकांमधून मोठा आनंद व समाधान व्यक्त होत आहे.

नगर शहरातील जुन्या मंदिरांपैकी एक असलेल्या गांधी मैदान येथील मार्कण्डेय महामुनींच्या मंदिरास मोठा ऐतिहासिक वारसा आहे. सुमारे १०२ वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले होते. मंदिराच्या कळसावरील सुरेख कोरीव नक्षीकाम, भव्य सभामंडप व आकर्षक भव्य मंदिर परिसरामुळे पद्मशाली समाजाबरोबरच सर्व समाजाच्या भाविकांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे. या मादिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी भाविकांमधून होत होती.

मात्र अनेक अडचणीमुळे हे काम होत नव्हते. मात्र गेल्या १० दिवसांपूर्वी श्री मार्कण्डेय देवस्थान ट्रस्टच्या नूतन कार्यकारणीची निवड झाल्यावर या महत्वाच्या कामासाठी तातडीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार बुधवारी पहाटे मंदिरातील श्री मार्कण्डेय महामुनींची पूजा व आरती करून श्री मार्कण्डेय मंदिर देवस्थान ट्रस्टचे नूतन अध्यक्ष श्रीकांत छिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम, श्रीपाद छिंदम, सरचिटणीस प्रकाश कोटा, खजिनदार अजय म्याना, विनायक गुडेवार यांच्या हस्ते नारळ वाढवून मार्कण्डेय महामुनींच्या जयजयकारात मंदिराच्या जीर्णोद्धारास सुरवात झाली.

यावेळी बोलताना श्रीकांत छिंदम म्हणाले, गेल्या १० दिवसांपूर्वी पद्मशाली समाजाच्या श्री मार्कण्डेय देवस्थान ट्रस्ट, पद्मशाली पंचकमिटी ट्रस्टच्या नूतन पदाधिकारीची नव्याने निवड करण्यात आली. यामध्ये समाजाने मोठ्या विश्वासाने माझ्यावर देवस्थानच्या अध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी टाकली आहे. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्णता करत तातडीने महत्वाचे निर्णय घेत श्री मार्कण्डेय महामुनींच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. यासाठी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळानेही सहमती दिली आहे. समाजाचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिराच्या पुनर्निर्मांनासाठी सर्व समाजाने हातभार लावावा, असे आवाहन केले.

मनोज दुलम म्हणाले, या ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच होता. मात्र देवस्थानचे नूतन अध्यक्ष श्रीकांत छिंदम यांनी धडाडीने निर्णय घेत पंचकमिटी, विद्या प्रसारक मंडळ व देवस्थानचे विश्वस्त यांच्याशी समनव्यातुन मंदिराच्या जीर्णोध्दारास सुरुवात करून जुना सभामंडप पडण्यास सुरवात झाली आहे. आता नव्या बांधकामास सुरवात लवकरच सुरवात होणार आहे.

माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम म्हणले, या ऐतिहासिक मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा ही सर्व भाविकांची इच्छा व स्वप्न होते. समाजाच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. मंदिराच्या कामास सुरवात झाल्याने सर्व भाविकांची इच्छापूर्ती आज होत आहे. गेल्या आठवड्यात समाजाने नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली. पद्मशाली पंचकमिटी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सब्बन व श्री मार्कण्डेय देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम व पदाधिकाऱ्यांनी विद्या प्रसारक मंडळाशी समन्वय साधून मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता कोणतेही विघ्न न येत हे काम पूर्णत्वास जाणार आहे. याचा सर्व समाजाला आनंद झाला आहे. या महत्वाच्या कामास समाजातील प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग देऊन सहकार्य करावे.

या प्रसंगी शंकर येमुल, योगेश सिद्दम, आनंद यंगल, हरिभाऊ येलदंडी, अजय लयचेट्टी , बालाजी गोणे व सर्व विश्वस्त पदाधिकारी तसेच पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष बालराज सामल, विनायक मच्चा, प्रवीण गुंडू व सर्व विश्वस्त पदाधिकारी उपस्थित होते. समाजाचे राजू विद्ये, रोहन येनगंदुल,महेंद्र येनगुल, अमोल बोल्ली, विनायक गुडेवार,राजू म्याना, सुमित इप्पलपेल्ली, राहुल गुंडू, महेश सब्बन,कृणाल बुरगुल, दीपक गुंडू, सुरज संदूपटला,सुनील कोडम आदी उपस्थित होते. नविन पदाधिकाऱ्यांनी सर्व समजामध्ये समन्वय साधून गेली अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावला या कार्याचे समाजातून व भक्तगणातून कौतुक होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...