मुंबई। नगर सहयाद्री
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. विजांचा गडगडाटसह पावसाने काही भागात एन्ट्री मारली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रात पुढील २४ तासात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पावसामुळे थंडीत वाढ झाली असून काही भागात धुक्याची चादर परसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, परभणी, बीड, हिंगोलीसह पुण्यात पुढील २४ तासात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.