spot_img
अहमदनगरशहरातील अनधिकृत थडगे तात्काळ हटवा; कोणी केली मागणी?

शहरातील अनधिकृत थडगे तात्काळ हटवा; कोणी केली मागणी?

spot_img

सकल हिंदू समाज बांधवांची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
रस्त्याच्या मधे येणारी धार्मिक स्थळे हटविण्यात यावीत असा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतांनाही अहिल्यानगर शहरातील थडगे हटविण्यात आलेली नाहीत. शहरातील अनधिकृत थडगे तात्काळ हटविण्यात यावीत या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज बांधवांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

अहिल्यानगर शहरात रविवारी पहाटेच्या सुमारास पटवर्धन चौक येथील सय्यद घोडेपीर दर्गाचे अज्ञात इसमांनी तोडफोड करुन नुकसान केले. हिंदु-मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावन्याचा प्रयत्न केला. तसेच दंगल घडून आणण्याच्या उद्देशाने कृत्य केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तीन आरोपींना अटकही केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अहिल्यानगर शहरात रस्त्याला अडथळा ठरणारी थडगी प्रशासनाने हटविली नाहीत. त्यामुळे शहरात वादाचे प्रसंग घडत आहेत. प्रशासनाने रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी थडगी पाडण्यात यावीत यामागणीसाठी सकल हिंदू समाज बांधवांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच याबाबत कार्यवाही न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिगंबर गेंट्याल यांनी यावेळी दिला. यावेळी हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थडगे हटवा, अन्यथा मोर्चा
अहिल्यानगर शहरात अनधिकृतपणे बांधण्यात आलेले थडगे काही लोकांनी पाडले. शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. अण्णा भाऊ साठे चौकात व सिव्हील हॉस्पिटल शेजारी असेलेले हिंदु समाजाचे मंदिर रस्त्याच्या मधे येत होते ते मागे घेण्यात आले. हे बंधन फक्त हिंदू समाज बांधवांनीच स्वीकारायचे का, असा सवाल करत मुस्लीम बांधवांनीही समजून घ्यायला हवे. त्याचाच उद्रेक शहरात रविवारी झाला. आठ दिवासांच्या आत शहरातील अनधिकृत थडगे प्रशासनाने हटवावेत अन्यथा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, दिगंबर गेंट्याल यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...