spot_img
तंत्रज्ञानगाडीच्या नंबरवरून काढा मालकाची कुंडली! फॉलो करा 'या' ट्रिक्स

गाडीच्या नंबरवरून काढा मालकाची कुंडली! फॉलो करा ‘या’ ट्रिक्स

spot_img

नगर सहयाद्री टीम-
एखादी अनोळखी व्यक्ती घरासमोर गाडी उभी करून तास-दोन तास तेथून बेपत्ता झाली असेल, किंवा अपघात घडलेल्या ठिकाणी गाडी सोडून चालक फरार झालेला असेल अशा परिस्थितीत, आपण फक्त विचार करतो की आपण या वाहनाच्या मालकाची माहिती मिळवू शकतो का?

जर तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला वाहनाच्या मालकाची सर्व माहिती त्याच्या नंबरवरून मिळवण्याचा मार्ग माहित करून घ्यावा लागेल. तसेच त्या साठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करून वाहन मालकाची संपूर्ण कुंडली मिळवू शकतात.

कशी जाणून घ्याल कार मालकाची कुंडली ?
1) तुमच्या फोनवर Messages ॲप उघडा. आता VAHAN <वाहन प्लेट नंबर> टाइप करा, उदाहरणार्थ: VAHAN MH01TR3522.आता हा एसएमएस 7738299899 या क्रमांकावर पाठवा. संदेश पाठवण्यासाठी एक रुपया शुल्क आकारले जाते. मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक माहिती मिळेल.

2) तुमच्या फोनमध्ये mParivahan ॲप डाउनलोड आणि इंस्टॉल करा. किंवा परिवर्तन वेबसाइट https://vahan.nic.in/ वर जा आणि वाहन नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, लेन्स चिन्हावर क्लिक करा. त्या वाहनाचा क्रमांक टाकल्यानंतर शोधा. यानंतर, तुम्हाला त्या वाहनाची संपूर्ण माहिती आणि वाहन मालकाचे नाव आणि पत्ता देखील दाखवला जाईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘राज्यमंत्री मंडळाची बैठक ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये भरणार’; जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार?

जामखेड । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मे महिन्याच्या अखेरीस...

पूजा खेडकर प्रकरणात मोठा निर्णय; सुप्रिम कोर्टात काय घडलं?, वाचा एका क्लिकवर..  

IAS Pooja Khedkar News: UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा...

तुमच्या घरावर भानामती? कुटुंबावर संकट! दोन महिलांनी रचला डाव; ३३ लाखाची ‘अशी’ केली फसवणूक

Maharashtra Crime News: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर...

नागरिकाभिमुख कारभारासाठी महानगरपालिका कटीबद्ध; आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरू...