spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics: भाजप हटाव.. लोकशाही बचाव! '१४६ खासदार निलंबनाच्या निषेधार्थ शहरात निदर्शने'

Ahmadnagar Politics: भाजप हटाव.. लोकशाही बचाव! ‘१४६ खासदार निलंबनाच्या निषेधार्थ शहरात निदर्शने’

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
हुकुमशाही पध्दतीने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी १४६ खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.२२ डिसेंबर) इंडिया आघाडीच्या वतीने शहरात मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजप विरोधात निदर्शने करण्यात आली. भाजप हटाव, लोकशाही बचाव…देश बचाव…, भाजप हटावच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात इंडिया आघाडीतील भाजप विरोधी घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी भाकपचे कॉ. सुभाष लांडे, बन्सी सातपुते, राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर, शिवसेनेचे संभाजी कदम, आम आदमी पार्टीचे प्रा. अशोक डोंगरे, राजेंद्र कर्डिले, भरत खाकाळ, रमेश नागवडे, अर्शद शेख, अ‍ॅड. श्याम आसवा, समाजवादी पार्टीचे अजीम राज, संजय नांगरे, फिरोज शेख, अब्दुल गनी, काकासाहेब खेसे, रवी सातपुते, अभिजीत वाघ, गंगाधर त्र्यंबके, सिद्धेश्वर कांबळे, बहिरनाथ वाकळे, बापूराव राशीनकर, चंद्रकांत माळी, संतोष गायकवाड, नगरसेवक दत्ता कावरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार निलंबनाच्या अतिरेकी कारवाई मधून या देशात अघोषित आणिबाणी लागू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. लोकशाही पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने संसदमध्ये दडपशाहीचे दर्शन या कारवाईतून झाले आहे. नवीन संसदेत सुरक्षा भेदून काही युवक घुसले, याबद्दल केंद्रीय गृहमंत्री यांना जाब विचारणार्‍या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

लोकशाहीच्या मार्गाने प्रश्न विचारलेल्या खासदारांच्या प्रश्नांना उत्तर न देता त्यांच्यावर निलंबनाची वेळ आली. अशाच पध्दतीने देशभर दडपशाही सुरु असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या वतीने करुन निदर्शने करण्यात आली. उपस्थितांनी आपल्या भाषणात भाजपच्या हुकुमशाही पध्दतीने सुरु असलेल्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. तर देश लोकशाही पर्वातून हुकुमशाही पर्वाकडे वाटचाल करत असल्याची उपस्थितांनी भावना व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...