अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
वर्तमान राज्य सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर औरजेबची कबर खणून काढावी. त्याचे कुठलेही अस्तित्व राहू देऊ नये. अन्यथा बजरंग दल चलो संभाजीनगर हा नारा देत कारसेवा करेल. छत्रपती संभाजी महाराज के सन्मान में बजरंग दल मैदान मे’ अशी घोषणा बजरंग दलाने दिली आहे. येत्या 17 मार्च रोजी आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र-गोवा बजरंग दल क्षेत्र संयोजक विवेक कुलकण यांनी पत्रकार परिषदेत दिला.
उझबेगी परकीय जिहादी आक्रमक बाबर याचा वंशज औरंगजेब.सगळ्या मुघलांची हिंदू द्वेष्टी परंपरा औरंगजेबाने अतिशय वेगात चालविली. त्याचे संपूर्ण आयुष्य खून, दगाबाजी, विश्वासघात व हिंदू द्वेष करण्यात गेले. आपल्या सर्व भावांचा खून करून व बापाला कैदेत टाकून याने मारले. शिख गुरु तेगबहादूर, व त्यांच्या बरोबर भाई मतिदास व भाई दियाला यांना क्रूरपणे दिल्ली येथे मारून टाकले. हिंदूधर्म रक्षणासाठी गुरूंनी हसत आपले बलिदान दिले. गुरू गोविंदसिंह व त्यांच्या परिवाराला पण अतिशय क्रूरपणे औरंगजेबाने ठार केले.
गुरूंच्या दोन बाल कुमारांना तर याच औरंगजेबाच्या सरदारांनी भिंतीत चिणून मारले. याचे वेड एवढे होते की, याने श्री काशी विश्वेश्वराचे देऊळ फोडले. काशीतील बिंदुमाधावाचे मंदिर फोडले. मथुरेतील प्रसिद्ध श्री केशवाचे मंदिर फोडून तेथील मूत आग्रा येथील मशिदीच्या पायऱ्याखाली गाडण्यात आल्या सौराष्ट्राचे सोमनाथ मंदिर यानेच उद्ध्वस्त केले. हिंदूंच्या सर्व सण, यात्रा यांवर बंदी घातली. हिंदूंवर जिझिया कर या औरंग्याने लादला. त्र्यंबकेश्वर येथील मंदिर पण नष्ट केले. जेजुरी गडावर आक्रमण केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदू स्वराज्याचा तर या औरंगजेबाने कायम द्वेष केला. महाराष्ट्राचे हे स्वराज्य संपविण्यासाठी त्याने श्री शिवछत्रपतींना कैद केले. छत्रपती शिवराय विलक्षण चतुराईने सुटले. पुढे छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा अतोनात छळ या औरंजेबने केला. सुमारे 40 दिवस हा छळ चालू होता. केवळ छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी हा छळ होता. ओरंग्याने रायगड दुर्गास आग लावली व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी राणी येसूबाई व पुत्र शाहू महाराज यांना कैद केले. अनेक वर्षे हे त्याच्या कैदेत होते. छत्रपती शाहू महाराजांचा धर्म परिवर्तनाचा प्रयत्न अनेक वेळा केला. नेताजी पालकरांना धर्मांतरण करण्यास यानेच भाग पाडले.
असा हिंदुद्वेष्टा, स्वतःच्या बंधू, बापाचा खून करणारा, या देशाशी, इथल्या संस्कृतीशी, परंपरांशी कुठलीही आत्मियता नसणारा व आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा छळून वध करणारा औरंग्या, याचे कुठलेही स्मारक, कबर या भारतात असणे म्हणजे एक प्रकारे त्याने केलेल्या अन्यायांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे. कुठल्याही परकीयांचे नामोनिशाण या स्वतंत्र भारतात असू नये. हा औरंगजेब अहिल्यानगर शहरात मेला व पुढे त्याचे अवयव छत्रपती संभाजीनगर शहरात पुरण्यात आले. तेथे त्याची कबर खणण्यात आली. आज त्याचे उदात्तीकरण चालू आहे.
स्थानिक प्रजेला अत्यंत पीडा देणारा, अन्यायी, दुराचारी, राष्ट्राचा शत्रू असणारा अशा औरंग्याची कबर अजून अस्तित्वात असणे हीच एक प्रकारची मानसिक गुलामी आहे. दिनांक 17 मार्च 2025 रोजी राज्यातील सर्व तहसीलदार तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र-गोवा बजरंग दल क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकण यांनी दिला आहे.