पोलिस अधीक्षकांसह संपूर्ण यंत्रणेचे अपयश | पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दलच शंका | दगडफेक अन् रास्तारोकोमुळे संपूर्ण शहरात तणाव
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगरशहरातील बारातोटी कारंजा परिसरात मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची रांगोळी थेट रस्त्यावर काढल्याचा प्रकार समोर येताच मुस्लिम समाज संतप्त झाला आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याने, विटंबना झाल्याने तणाव निर्माण झाला. त्यातून संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आणि त्यांनी कोठला परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतरही मुस्लिम समाजातील काही विघ्नसंतोषी तरुणांनी रस्त्यावरील काही वाहनांच्या काचा फोडल्या. काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, परिस्थिती आटोक्यात आणली गेली असली तरी धार्मिकतेढ निर्माण होण्यासारखी घटना घडली असताना पोलिसांना त्याबाबत उशिरा समजणे, त्यावर लागलीच उपाययोजना करणे यावर पोलिस यंत्रणा प्राथमिक टप्प्यात सपशेल अपयशी ठरली. पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग आणि गुडमॉर्निंग पथक कुचकामी ठरल्यानेच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
आक्रमक आणि चिथावणीखोर घोषणा!
सकाळपासूनच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यातून अनेक भागांमध्ये विशेषत: मुस्लिम बहुलभागात अफवांचे पिक माजले. ते कमी करण्याचा किंवा त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रभावी प्रयत्न पोलिसांकडून झाला नाही. त्यातूनच पुढे कोठला परिसरात मुस्लिम समाजातील काहीजण एकत्र आले आणि ते सारे मिळून अचानक रस्त्यावर आले. रास्तारोको सुरू होताच आंदोलनातील काहींनी आक्रमक आणि चिथावणीखोर भाषणे सुरू केली. काहींनी घोषणा दिल्या आणि त्यातून जमाव संतप्त झाला.
संशयीताला ताब्यात घेतले!
बारातोटी कारंजा परिसरात घटना घडल्याचे समोर आल्यानंतर मुस्लिम समाज रस्त्यावर आला. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि एका संशयीतास ताब्यात घेतले. सदर कृत्य करण्यात दोन संशयित आरोपी असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून यापैकी एका संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रास्तारोकोची गरजच नव्हती- आ. जगताप
झालेली घटना निंदणीय आहे. या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असताना व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असताना या अनुषंगाने आणखी धार्मिक तेढ वाढवून त्याठिकाणी प्रक्षोभक भाषणे झाली आणि रास्ता रोको आंदोलन झाले. त्यातूनच पुढे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. वास्तविक रास्ता रोको आंदोलनाची गरजच नव्हतीश अशी प्रतिक्रीया आ. संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शाळा सोडून दिल्याने विद्यार्थी- पालकांची चिंता वाढवली!
नगर शहरातील धार्मिक तेढीतून झालेल्या दगडफेकीच्या घटनेची माहिती शाळा आणि संस्था चालकांना समजताच सकाळी अकरानंतर त्या- त्या शाळांमधून पालकांना फोन केले गेले. पाल्याला स्वत: येऊन घेऊन जा, असे सांगण्यात आल्याने पालकांची चिंता वाढली. अनेक पालकांनी मिळेल त्या वाहनाने शाळा गाठली आणि आपल्या पाल्याला ताब्यात घेऊन घर गाठले.
वाहनांच्या रांगा लागल्याने ट्राफीक जॅम!
दगडफेक आणि वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडल्याने एसपी चौक ते जुने बसस्थानक या संपूर्ण रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. चाँदणी चौक आणि स्टेट बँक चौकात जवळपास दोन तास वाहनांची कोंडी झाली होती. रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर जवळपास दीड तासाने वाहतूक सुरळीत झाली. या वाहतूक कोंडीने अनेकांची चिंता वाढली होती.
कोठला परिसरात प्रचंड धावपळ
कोठला परिसरात अचानकपणे रास्तारोको आंदोलन आणि जमावातील काहींनी दगडफेकीसह वाहनांची नासधुस केली. वाहनांच्या काचा फोडल्या. त्यातून स्थानिक रहिवाशांसह व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापना बंद केल्या. एकाचवेळी हे सारे घडत असल्याने मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली आणि त्यातून धावपळ देखील उडाली.
हल्लेखोरांना तत्काळ अटक करा- आ. जगताप
घटनेतील दोषीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असतानाही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याचवेळी काही समाजकंटकांनी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या समाजकंटकांना तत्काळ अटक करुन त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
नगर शहरात झालेल्या प्रकाराबद्दल पोलिसांनी हस्तक्षेप केला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

algolist: 0;
multi-frame: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 278.0432;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 30;
आक्षेपार्ह फलक का काढले नाही?- आ. जगताप
नगर शहरात यापूर्वीच लावलेल्या आक्षेपार्ह बोर्डांचा मुद्दा आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केला असून हे बोर्ड याआधीच काढले गेले असते तर हे असे प्रकार थांबले असते असा दावा आ. संग्राम जगताप यांनी केला आहे.
संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता
सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसून येत आहे. गल्लीबोळात या घटनेच्या अनुषंगाने उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. पोलिस या प्रकरणात उशिराने जागे झाले असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत होत्या. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, काही समाजकंटक दुपारी उशिरापर्यंत सामाजिक स्वास्थ्य बिघडेल अशा प्रतिक्रिया वेगवेगळ्या समाजमाध्यमांतून देत असताना आता त्यावर पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे आता जास्त औत्सुक्याचे ठरणार आहे.
शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये ः टिपरसे
रांगोळीच्या माध्यमातून मुस्लीम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या प्रकरणी दोघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे, कोतवाली पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.