spot_img
ब्रेकिंगकांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; निर्यात शुल्कात मोठी घट; मुख्यमंत्री म्हणाले...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; निर्यात शुल्कात मोठी घट; मुख्यमंत्री म्हणाले…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कांद्याच्या निर्यात शुल्कामध्ये २० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांदा निर्यातीवरील ४० टक्के निर्यात शुल्कात निम्म्याने कपात करण्यात आली आहे.

केंद्राने कांदा निर्यातीवरील ५५० डॉलर निर्यात मूल्य हटवल्यानंतर आजपासून निर्यात शुल्कात देखील कपात करण्यात आली आहे. यामुळे कांदा निर्यातीत वाढ होण्यास मदत होणार आहे. निर्यतीवरील बंधनं कमी केल्याने आगामी काळात कांद्याचे भाव वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातीवरील बंधन कमी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील या निर्णयानंतर चर्चा रंगली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने लावलेली निर्यात बंदी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उठवली होती. मात्र, निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आली होती. मात्र, हे शुल्क २० टक्के करण्यात आल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून कांद्याच्या किमतीवर देखील याचा परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने बासमती तांदळाच्या देखील किमान निर्यात मूल्यावरील मर्यादा हटविली. बासमती तांदळावर ९५० डाॅलर प्रति टन एवढी किमान मर्यादा हाेती. गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये निर्यात मूल्य १२०० डाॅलर प्रति टनांवरुन घटवून ९५० डाॅलरवर आणले हाेते. भारतातून गेल्या आर्थिक वर्षात ५.९ अब्ज डाॅलर मूल्याची बासमती तांदळाची निर्यात झाली आहे.

त्याचबरोबर खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील कांदा, बासमती तांदूळ आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहे.

CM एकनाथ शिंदे ट्वीट
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत लिहिले की, “कांदा निर्यातीवरचे किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद देतो. कांद्यावरील निर्यात बंदी अगोदरच उठविण्यात आली होती. मात्र निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत होते.” “मी देखील या संदर्भामध्ये केंद्राला विनंती केली होती. किमान निर्यात शुल्क (५५० डॉलर्स प्रति मेट्रिक टन ) हटवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, ” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...