spot_img
अहमदनगरशेतकर्‍यांना दिलासा!! घोड व कुकडीचे आवर्तन सुटले, श्रीगोंद्यावर मात्र अन्याय?

शेतकर्‍यांना दिलासा!! घोड व कुकडीचे आवर्तन सुटले, श्रीगोंद्यावर मात्र अन्याय?

spot_img

श्रीगोंदा। नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुयाला वरदान ठरलेल्या घोड व कुकडीचे आवर्तन एक मार्च रोजी सोडण्यात आले. शनिवारी मध्यरात्री श्रीगोंदा कर्जत सीमेवर आवर्तन पोहोचले. उन्हाळी हंगामासाठी हे आवर्तन असणार आहे. घोड, कुकडीच्या आवर्तनाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

या वर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने विहिरी व कुपनलिकांच्या आहे त्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांकडूनही आवर्तनाची मागणी वाढली गेली होती. एक मार्च रोजी घोडचे १२० युसेस , दोन मार्च रोजी २७५ तर ३ मार्च रोजी सकाळी ४०० युसेसने आवर्तन सोडण्यात आले अशी माहिती मढेवडगाव घोड सिंचनचे उपविभागीय अधिकारी टनके यांनी दिली.

टणके म्हणाले, घोडचे हे २७ दिवसाचे आवर्तन असून उन्हाळी हंगामाच्या पिकांना या आवर्तनचा दिलासा मिळणार आहे. शेतकर्‍यांनी देखील आवर्तन कालावधीमध्ये पाण्याचा अपव्य न करता पुरेल तेवढेच पाणी शेती पिकांना घ्यावे. धरणातील पाणी हे पिण्यासाठी राखीवसाठा म्हणून जिल्हा प्रशासन आरक्षित ठेवण्याची दाट शयता असल्याने दुसरे आवर्तन सोडले मात्र ते अल्पकालावधीसाठी राहील. अशी शयता वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे समजते. त्यामुळे उन्हाळी हंगामाचे शेतकर्‍यांनी योग्य नियोजन करून पिकांसंदर्भात काळजी घ्यावी असे देखील आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान घोडबरोबर कुकडीचे देखील एक मार्चपासून आवर्तन सोडण्यात आलेले असून हे आवर्तन ७०० युसेसने टेलकडे मार्गस्थ झाल्याचे जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. कुकडीचे हे आवर्तन ३६ दिवसाचे असणार आहे. प्रारंभी कर्जत करमाळ्याकडे आवर्तन सोडण्यात आलेले असून त्यानंतर श्रीगोंदा व इतर तालुयांना हे सोडण्यात येईल असे कुकडीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

आवर्तनबाबत श्रीगोंद्यावर अन्याय?
उन्हाळी हंगामात आवर्तनबाबत श्रीगोंदा तालुयावर नेहमीच अन्याय होतो अशी भावना काही शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. यंदा अत्यल्प पाऊस असल्याने आतापासूनच विहिरीवर, कुपनलिकांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा देखील प्रश्न तितकाच गंभीर बनला. अशा परिस्थितीत हे आवर्तन अत्यंत महत्वाचे होते. त्यामुळे उन्हाळी पिके व फळबागा वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची मोठी कसरत होणार आहे. त्यात आवर्तन उशिरा सोडल्यास श्रीगोंदा तालुयातील शेतकर्‍यांचे पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो त्यामुळे जास्त विलंबाच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा दावा येथील शेतकर्‍यांमधून व्यक्त केला जात आहे. अधिकार्‍यांनी देखील उन्हाळी हंगामातील हे आवर्तन महत्त्वाचे असल्याने श्रीगोंदा तालुयातील शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ असा इशाराही शेतकर्‍यांनी दिला असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...