spot_img
देशकाँग्रेसला दिलासा! 'ती' कारवाई लोकसभा निवडणुकीनंतर होणार?

काँग्रेसला दिलासा! ‘ती’ कारवाई लोकसभा निवडणुकीनंतर होणार?

spot_img

Congress News : लोकसभा निवडणुकीआधीच आयकर विभागाने काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. आयकर विभागने ३५०० कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस दिली होती. या दरम्यान, आता काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस विरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचे प्राप्तिकर विभागाने सोमवारी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाची सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलण्यात यावी आणि निवडणुकीनंतरच सुनावणी घेण्यात यावी, असे विभागाने न्यायालयाला सांगितले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्हाला कोणत्याही पक्षाचा त्रास वाढवायचा नाही, असंही आयकर विभागाने न्यायालयात म्हटले आहे. यावर आता कोर्टाने पुढील सुनावणी २४ जुलै रोजी घेणार असल्याचे सांगितेले आहे. केंद्र सरकार आयकर विभागाचा वापर करून पक्षाला अस्थिर करू इच्छिते, असा आरोप यापूर्वी काँग्रेसने केला होता.

आयकर विभागाच्या कारवाईवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली हीत. ‘देशातील लोकशाही संपली आहे. आमची खाती गोठवली गेली आहेत आणि शेकडो कोटींच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. यानंतरही देशाचे न्यायालय, निवडणूक आयोग आणि माध्यमे गप्प आहेत. सर्वजण एकत्र शो पाहत आहेत. लोकशाही नष्ट करण्याचा डाव आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...