Crime News: एक धक्कदायक बातमी उजेडात आली आहे. घरी आलेल्या नातेवाइकाने १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब मूळचे हरियाणाचे असून जयपूरमध्ये भाड्याने राहत आहेत. पीडितेचे वडील हे मजूर म्हणून काम करतात. बुधवारी रात्री पीडित मुलगी तिच्या आई आणि दोन लहान बहिणींसह एका खोलीत झोपली होती.
यादरम्यान तिच्या कुटुंबातील एक तरुण खोलीत आला, त्याने तिला उठवले आणि खोटे सांगत तिला छतावर नेले. तिथे पोहोचल्यावर त्याने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला.
यादरम्यान पीडित मुलगी मोठ्याने ओरडू लागली. मुलीच्या आवाजाने शेजारचे जागे झाले. घरातील कुटुंबीयांनीही आवाजाचा मागोवा घेत गच्ची गाठली. मुलीच्या कुटुंबियांना घटनास्थळी आरोपी मुलीवर अत्याचार करताना आढळून आला.
मुलीच्या वडिलांनी आणि शेजाऱ्यांनी या आरोपी तरुणाला बेदम मारहाण केली.पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



