spot_img
देशरील्स बनवणे पडले चांगलेच महागात!

रील्स बनवणे पडले चांगलेच महागात!

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अनेक जण रीलच्या माध्यमातून सुपरहिट झाले असल्याचे अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. परंतु याच रील ने पुन्हा एकदा एकाचा बळी घेतला आहे.सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुण पिढी काहीही करायला तयार असते. रील्स तयार करण्यासाठी ते आपला जीव धोयात घालतात.

कधी इमारतीवरून उडी मारून स्टंट, कधी चालत्या बाईकवर स्टंट, तर कधी पाण्यामध्ये स्टंट करून ते रील्स तयार करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण अशापद्धतीने रील्स तयार करणे हे अनेकांच्या जीवावर बेतते. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. रील्स तयार करण्याच्या नादामध्ये एका तरुणाने आपला जीव गमावला आहे.

राजस्थानच्या उदयपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका तरुणाने रील्स तयार करण्यासाठी तब्बल १५० फूटांवरून खदानीत उडी मारली. या घटनेमध्ये खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू झाला. दिनेश मीणा असं या तरुणाचे नाव आहे. उदयपूर शहरातील गोवर्धन विलास पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लाई गावामध्ये हा तरुण राहत होता. हा तरुण आपल्या चार मित्रांसोबत खदानीवर फिरण्यासाठी गेला होता. याठिकाणी तो मित्रांसोबत इन्स्टाग्रामवर रील्स शूट करत होता. त्याचवेळी रील शूट करण्यासाठी त्याने खदानीत उडी मारली पण तो परत बाहेर आलाच नाही. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दिनेशने रील्स बनवण्यासाठी १५० फुटांवरुन खदानीत उडी मारली. तो पाण्याच्या बाहेर आलाच नाही. त्यामुळे मित्रांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सिव्हिल डिफेन्स पथकाच्या सहाय्याने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

श्रीरामपूर/ नगर सह्याद्री    श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा...

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...