spot_img
अहमदनगरमतदानासाठी मांत्रिकाच्या सल्ल्याने रेडे कापले!; नगरमधील मतदारांमध्ये रंगली चर्चा

मतदानासाठी मांत्रिकाच्या सल्ल्याने रेडे कापले!; नगरमधील मतदारांमध्ये रंगली चर्चा

spot_img

नगरमधील मतदारांमध्ये रंगली चर्चा | अंधश्रद्धेतून गंडेदोरे अन् बाबाचा सल्ला मानल्याची चर्चा
अहमदनगर | नगर सह्याद्री
मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना आता कोणत्याही परिस्थितीत मतदारांना आकर्षीत करण्याचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. नगरमध्ये त्याच्याही पलिकडचा अजब फंडा राबविण्यात आल्याची चर्चा झडत आहे. नगरमधील एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एका मांत्रिकाने रेडा कापला तरच तू विजयी होणार असा सल्ला देताच त्या उमेेदवाराने एक- दोन नव्हे तर तब्बल अकरा रेड्यांचा बळी दिल्याची चर्चा झडू लागली आहे. मांत्रिकाचा हा अजब सल्ला मानणारा आणि त्यानुसार अकरा रेड्यांचा बळी देणारा उमेदवार नक्की कोण याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, सदरचा प्रकार घडला असल्याची जोरदार चर्चा या मतदारसंघात सुरू असून अंधश्रद्धेतून गंडेदोरे अन् मांत्रिक यांचा सल्ला शिरसावंद्य मानून रेड्यांचा बळी देणारा हा उमेदवार आता अनेकांच्या चेष्टेचा विषय झाला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, नगर लोकसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. मतदानाची तारिख जसजसी जवळ येत आहे तसतशी चर्चा अधिक वेगाने झडत आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात विखे यांच्या बाजूने झुकल्याची चर्चा सुरू झाली.

भावनिक मुद्यांवरील ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात विकासाच्या मुद्यावर आली. त्यातून लोकसभेतला आपल्या मतदारसंघातील चेहरा नक्की कसा असावा आणि त्याची समज कशी असावी याबाबत चर्चा झडली, देशाचा कल कुणीकडे आणि त्यानुसार आपल्या भागाचा प्रतिनिधी हा केंद्रात सत्तेत असणार्‍या पक्षाचा असावा अशी भावनाही वाढीस लागली.

दरम्यान, मतदानाच्या शेवटच्या आठवड्यात एका मोठ्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराने एका मांत्रिकाला गाठले आणि आपल्या विजयासाठी काय केले पाहिजे अशी विचारणा केली. त्यानुसार सदर मांत्रिकाने अकरा रेड्यांचा बळी दिल्यास तुमचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. त्यानुसार लागलीच यंत्रणा हलली आणि त्या उमेदवाराच्या समर्थकांनी एका नदी वजा ओढ्याच्या तिरावर अकरा रेड्यांचा बळी दिल्याची चर्चा सध्या सोशल मिडियावर जोरदारपणे आहे. घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी तो उमेदवार कोण याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...