spot_img
ब्रेकिंगरविवारी सत्कार सोहळा! आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांची मोठी माहिती

रविवारी सत्कार सोहळा! आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांची मोठी माहिती

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्याचे पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती, व महायुतीचे नवनिर्वाचीत आमदार यांचा सत्कार समारंभ रविवार दि.23 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, स्टेशन रोड, येथे नगर तालुका महायुतीच्या वतीने आयोजीत करण्यात आला असल्याची माहीती आ. शिवाजीराव कर्डिले , भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.

या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मुत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, आमदार आमदार शिवाजीराव कडले राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

यावेळी आ. मोनिकाताई राजळे, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ. किरण लहामटे, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ.अमोल खताळ या जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे महानगर अध्यक्ष अभय आगरकर, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, सुनिल साळवे, संपत बारस्कर, सुरेंद्र थोरात आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, दिलीप भालसिंग, दिपक कार्ले, संतोष म्हस्के, दिपक लांडगे, रेवणनाथ चोभे, धर्मनाथ आव्हाड, सुधीर भापकर, अभिलाष घिगे, सुभाष निमसे, बाजीराव हजारे, भाऊसाहेब ठोंबे, महेश वाघ आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...

गुड न्यूज! 13 मे पर्यंत मान्सून अंदमनात धडकणार

मुंबई | नगर सह्याद्री मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यावष मान्सून लवकरच दाखल होणार...