सिव्हील हॉस्पिटल हेच दिव्यांग दाखल्यांचे रॅकेट; केंद्रबिंदू आजही पारनेर तालुक्यातच | दोन डझन शिक्षक नेते होतील गजाआड
सारिपाट | शिवाजी शिर्के:-
दिव्यांग बनावट प्रमाणपत्रांचे मोठे रॅकेट बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये उघडकीस आले. मात्र, त्याआधीपासूनच हे रॅकेट राजरोसपणे चालू होते आणि आताही त्याच गतीने चालू आहे. बारा वर्षापूर्वी आरोपी म्हणून ज्या मास्तरांची नावे पुढे आली त्यात मास्तरांचा नेता म्हणवून मिरवून घेणार्या रा. या. औटी हाच मुख्य आरोपी! त्यानेच त्यावेळी जवळपास दोनशेपेक्षा जास्त शिक्षकांना बनावट दाखले मिळवून दिले. त्याच्या मुसक्या त्याचवेळी आवळल्या गेल्या असत्या तर आज मोठी चपराक बसलेली दिसली असती. बारा वर्षापूर्वी वाचल्यानंतर शांत बसेल तो रा. या. कसला? त्याने त्याचे उद्योग चालूच ठेवल्याची माहिती आणि त्याच्या सुरसकथा समोर येत आहेत. त्यामुळेच आता नव्याने उघडकीस होत असलेेल्या बनावट दाखल्यांमध्ये देखील तोच मुख्य सुत्रधार असल्याची जाहीर चर्चा झडत आहे. दिव्यांगांच्या बनावट दाखल्यांचे रॅकेट सिव्हील हॉस्पिटलमधून चालत असले तरी त्याचा केंद्रबिंदू पारनेरमध्ये आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल होत असताना किमान दोन डझन शिक्षक नेत्यांवर गुन्हे दाखल होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दिव्यांग बनावट प्रमाणपत्रांचे मोठे रॅकेट बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये उघडकीस आले. मात्र, त्याआधीपासूनच हे रॅकेट राजरोसपणे चालू होते आणि आताही त्याच गतीने चालू आहे. बारा वर्षापूर्वी आरोपी म्हणून ज्या मास्तरांची नावे पुढे आली त्यात मास्तरांचा नेता म्हणवून मिरवून घेणार्या रा. या. औटी हाच मुख्य आरोपी! त्यानेच त्यावेळी जवळपास दोनशेपेक्षा जास्त शिक्षकांना बनावट दाखले मिळवून दिले. त्याच्या मुसक्या त्याचवेळी आवळल्या गेल्या असत्या तर आज मोठी चपराक बसलेली दिसली असती. बारा वर्षापूर्वी वाचल्यानंतर शांत बसेल तो रा. या. कसला? त्याने त्याचे उद्योग चालूच ठेवल्याची माहिती आणि त्याच्या सुरसकथा समोर येत आहेत. त्यामुळेच आता नव्याने उघडकीस होत असलेेल्या बनावट दाखल्यांमध्ये देखील तोच मुख्य सुत्रधार असल्याची जाहीर चर्चा झडत आहे. दिव्यांगांच्या बनावट दाखल्यांचे रॅकेट सिव्हील हॉस्पिटलमधून चालत असले तरी त्याचा केंद्रबिंदू पारनेरमध्ये आहे. या संपूर्ण प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल होत असताना किमान दोन डझन शिक्षक नेत्यांवर गुन्हे दाखल होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील पूजा खेडकर यांच्या बनावट अपंग दाखल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर नगरमध्ये २०१२ मध्ये गाजलेले असेच प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणात तब्बल ९३ शिक्षक आणि या रॅकेटचे सुत्रधार आरोपी आहेत. बारा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या आरोपींच्या विरोधात कोणतीच कारवाई झाली नाही. प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने तारीखे पे तारिख पडत आहे. यातील एक- दोन आरोपींचा मृत्यू देखील झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात ज्या ९३ आरोपींची नावे पुढे आली त्या नावांवर एक नजर टाकली तर ही सर्व मंडळी धडधाकट असतानाही त्यांनी शासनाची दिशाभूल करत बोगस दाखले मिळवले आणि त्या आधारे लाभ देखील उठवला.
जिल्हा परिषद प्रशासनाने सन २०१२ मध्ये मोठा राजकीय दबाव असतानाही या बोगस दाखले मिळविणार्या मास्तरांची यादी तयार केली आणि त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाल्यानंतर काही महिने हे सारे मास्तर भूमिगत झाले. मात्र, प्रकरण शांत होताच पुन्हा समाजात आपण स्वच्छ असल्याच्या अर्विभावात फिरु लागले. यात प्रामुख्याने या टोळीचा म्हणजेच मास्तरांचा नेता म्हणवून मिरवून घेणारा पारनेर येथील रावसाहेब औटी हा प्रमुख राहिला. सेवानिवृत्तीनंतरही त्याचे उद्योग आजही चालूच आहेत. आरोपींच्या यादीत या औटी याच्या प्रमाणेच कैलास भागवत चिंधे, बाबूराव ठकाजी झावरे, भिमाजी तुकाराम लोंढे, सुंदरराव भीमजी झावरे, सोपान जगन्नाथ राऊत, राजेंद्र बाबाजी दाते, अशोक दिनकर पायमोडे, भास्कर बाबाजी दाते, सुनील मारुती झावरे, रेवणनाथ कारभारी चेमटे, बाबासाहेब गिरजू रोहोकले, बापू यादव रोहोकले, बाळासाहेब पंढरीनाथ रोहोकले असे प्रमुख शिक्षक नेते म्हणवून घेणारे आरोपी ठरले आहेत.
सन २०१२ मध्ये आरोपीच्या यादीत ७६ शिक्षकांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये सुवर्णा मोहन अकोलकर, संगीता पीटर जाधव, रेश्मा जयप्रकाश सोनवणे, भिमाजी तुकाराम लोंढे, योजना नारायण काकड, ललिता भाऊसाहेब जाधव, नाथू तुकाराम मुठे, विद्या किसनराव राऊत, बबन किसन देवढे, महादेव किसन देवढे, संजय चंद्रकांत साळवे, संजय सोपान कांबळे, संतोष हिरामण लष्करे, ज्ञानेश्वर चंद्रकांत शेवारे (मयत), सदाशिव नारायण व्यवहारे, अनिल रंगनाथ बदगरे, अंबादास धोंडीबा ठाणगे, गणपत शंकर लगड, शैला सुखदेव दुधाडे, रत्नाबाई सुभाष ठुबे, पुष्पवती मारुती ठुबे, दिनकर भाऊ ठोकळे, आशा भाऊसाहेब रेपाळे, आशा तुकाराम वैद्य, कमल रघुनाथ खनकर, उषा भाऊसाहेब बनकर, स्नेहलता बाळकृष्ण सुंबरे, प्रमिला रामभाऊ दाते, आशा नामदेव नवले, मारुती नाथा खोसे, बाबूराव ठकाजी झावरे, प्रकाश नामदेव गोर्डे, बबन दगडू शिंदे, ज्ञानेश्वर बाळूजी माळवे, रामदास ठकाजी गाढवे, सुंदरराव भीमजी झावरे, सोपान जगन्नाथ राऊत, राजेंद्र बाबाजी दाते, अशोक दिनकर पायमोडे, भास्कर बाबाजी दाते, सुनील मारुती झावरे, अलका चंद्रभान खोडवे, गंगूबाई मारुती झावरे, संतोष सीताराम हरदे, राधा लक्ष्मण पटारे, रेवणनाथ कारभारी चेमटे, संगीता साधू टोणपे, सरला बापूराव गावडे, सुवर्णा उत्तरेश्वर मोहोळकर, वैशाली नारायण लोंढे, रोहिनी दगडू डोमे, गोरख बापूराव धस, बन्सी लक्ष्मण जगताप, भीमाबाई विठ्ठल शिर्के ऊर्फ भीमाबाई नवनाथ चिकणे, शिवाजी गंगाराम हुलवळे, नितीन नारायण आंधळे, दिगंबर आबासाहेब फराटे, बाबासाहेब गिरजू रोहोकले, बापू यादव रोहोकले, बाळासाहेब पंढरीनाथ रोहोकले, रामदास श्रीहरी बोरुडे, संपत बाबूराव भागवत, अजय नामदेव पवार, मनोहर दादाभाऊ काळोखे, विठ्ठल रामभाऊ क्षीरसागर, भिका मारुती गायकवाड, निर्मला बाबूराव राजगुरु, अरुणा दशरथ घस, महेश दिनकर बारगजे, राजेंद्र तुकाराम पोकळे, अशोक संपत मगर, कैलास भागवत चिंधे, सुनीता नानासाहेब थोरात, रावसाहेब यादव औटी, सुरेश विठ्ठल नवले, रामदास भगवान शिंदे, तानाजी किसन गोडे, संजय पोपट घोडके, हेमंत श्रावण वाघमारे, अब्दुल हमीद जफरबाई शेख, रजनी दत्तात्रय वाहुत्रे, सोमनाथ मारुती अरण्या, सुहास नामदेव वाळके, दत्तात्रय लक्ष्मण पटारे, सूर्यभान मोहन वडितके, मोहम्मद बदर बानेसाहेब शेख, मोहन गवनाथ लामखडे, किसन मारुती गोल्हार, श्रीकांत चंद्रकांत पाठक, अंबादास हरी ससे, पोपट आनंदा सोनवणे, मिच्छिंद्र शंकर दिवसे, ज्योती गणपत लगड हे नावग असून यातील काही एजंट आहेत तर काही सिव्हीलमधील कर्मचारी आणि काही अपंग संघटनेचे कथीत पदाधिकारी देखील आहेत. दरम्यान, सदर प्रकरणा २०१३ मध्ये न्यायालयात दाखल झाल्यानंतर आजपर्यंत त्याचे दोषारोपपत्र ठेवले गेले नाही हे विशेष! त्यामुळे या खटल्याची सुनावणी अद्यापही सुरू होऊ शकली नाही. दरम्यान, दोषारोप पत्र दाखल न झाल्याने गेल्या बारा वर्षात यातील प्रमुख आरोपींनी पुरावेच नष्ट केले असल्याची भिती आता व्यक्त होऊ लागली आहे. नव्याने समोर आलेल्या प्रकरणांचा विचार करता सिव्हील हॉस्पिटलसह पोलिस यंत्रणेने यात प्रमुख भूमिका बजावण्याची गरज आहे.
दोषारोप पत्रासह दोषी शिक्षकांच्या विरोधात ‘स्नेह’ हायकार्टात दाद मागणार
बनावट अपंग दाखले आणि त्या आधारे लाभ घेत शासनाची फसवणूक करणार्या शिक्षकांसह कर्मचार्यांच्या विरोधात कारवाईची मागणी ‘स्नेह’ या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. सदर प्रकरण वेगळ्या तटस्थ यंत्रणेकडे सोपवा अशी मागणी करणारे निवेदन ‘स्नेह’ या स्वयंसेवी संस्थेने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. ‘स्नेह’ या स्वयंसेवी संस्थेच्या अभय शिंदे यांनी सन २०१२ मधील दोषी ंबशिक्षक आणि त्यांच्यावरील कारवाई याबाबत थेट मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असून या सर्वांवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. सदर प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही अभय शिंदे यांनी म्हटले आहे.
आपसात भांडणार्या शिक्षक नेत्यांची ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’ का?
शिक्षक बँकेसह संघटनांच्या माध्यमातून एकमेकांची उणीदूणी काढत आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे शिक्षक नेते बनावट अपंग दाखल्यांच्या मुद्यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत. मुळातच या शिक्षक नेत्यांनीच बनावट दाखले काढले आणि लाभ घेतला. यातील ८० टक्के शिक्षकांना असे बोगस दाखले काढून देण्याचे काम रा. या. औटी या शिक्षक नेत्याने केले. सध्या हा नेता सेवानिवृत्त झाला असला तरी निवृत्तीनंतरही त्याचे उद्योग बंद नाहीत. पारनेरमध्ये बसून अपंगांचे बोगस दाखले मिळवून देण्याचे रॅकेट त्याच्याकडून चालवले जात असून त्याच्या मुसक्या आवळल्यास किमान तीनशे- चारशे बोगस प्रकरणे चव्हाट्यावर येतील आणि सिव्हील मधील रॅकेट देखील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.