spot_img
ब्रेकिंगरवींद्र धंगेकर पुण्यातील वाल्मिक कराड! काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप..

रवींद्र धंगेकर पुण्यातील वाल्मिक कराड! काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप..

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर रामराम करत रविंद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. धंगेकर सोडून गेल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंद शिंदेंनी धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ससून, पब, ड्रग्स हे सगळे आंदोलन त्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठीच केले यात कुठेही काँग्रेसचा झेंडा नव्हता. काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा मोठा दावा केला आहे. हा पुण्यातील वाल्मिक कराड असल्याचं शिंदेंनी म्हटले आहे.

ज्याची विचारधारा शुन्य त्यावर बोलणार नव्हती, पक्ष कुठच कमी पडला नाही. चारवेळा संधी दिली तरी गेले, मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता. पक्षाने 3 वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून 4 वेळा संधी दिली. ज्यादिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही. खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांविषयी बोलणार नाही. त्यांच्या व्यक्तीगत दुष्कारणांसाठी गेले.

काँग्रेस पक्षाने मान दिला, पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाही. आता यांना मतदारांनी नाकारलं आहे, त्यांना लीड घेता आल नाही. पक्षाने माझ्यासाठी काम करावं मी पक्षासाठी काम करणार नाही अशी भूमिका ते घेत होते. यापुढे पक्षाला विनंती अशा लोकांना पक्षात घेऊ नये, यांचा इतिहास असाच आहे. विचारधारा एक नाही काहीच नाही. हे संधीसाधूपाण करत आहेत आम्ही पक्षाला सांगितल्यचं शिंदेंनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर तर ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणे

मुंबई । नगर सहयाद्री:- कडक उन्हाळ्यात बरेच जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतात....

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १०० आणि २०० च्या नव्या नोटा लॉन्च करणार!, जुन्या नोटा…

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. १००...

नशीब चमकणार! ‘या’ राशीसाठी आनंदाची बातमी, वाचा राशिभविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर...

विना परवाना रस्ता खोदणे पडले महागात’; महापालिकेची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री चितळे रस्त्यावर भराड गल्ली येथे महिनाभरापूव नव्याने करण्यात आलेला काँक्रिटचा रस्ता...