spot_img
अहमदनगररवी राणांच्या वक्तव्याचा संगमनेरात निषेध; दुर्गाताई तांबे म्हणाल्या,'ते 'पैसे जनतेचे आहे, महायुतीचे..

रवी राणांच्या वक्तव्याचा संगमनेरात निषेध; दुर्गाताई तांबे म्हणाल्या,’ते ‘पैसे जनतेचे आहे, महायुतीचे..

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्राला संत व समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान केला जातो. मात्र महायुती सरकारने मते खरेदी करण्याच्या नावावर महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत. सरकारच्या घोषणासाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे. महायुतीचा नाही. आ. रवी राणांसह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी अशी मागणी सौ दुर्गाताई तांबे यांनी केली आहे.

संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांचा निषेध करण्यात आला .यावेळी नगराध्यक्षदुर्गाताई तांबे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, सुरेश थोरात, निखिल पापडेजा, अर्चनाताई बालोडे, पद्माताई थोरात, .मीनाक्षीताई थोरात, प्रमिला अभंग, दिपाली वर्पे, मीना थेटे, प्राजक्ता घुले, शितल उगलमुगले,ओमकार बिडवे, शुभम घुले, गौरव डोंगरे, जावेद शेख, तानाजी शिरतार, आनंद वर्पे , मीराताई शेटे ,बेबीताई थोरात, सौ निर्मलाताई राऊत,नवनाथ आरगडे,सुभाष सांगळे ,एकनाथ श्रीपाद ,अलोक बर्डे, अमित गुंजाळ आदींसह युवा काँग्रेस व महिला काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, महाराष्ट्राला थोर समाज सुधारक आणि संतांची परंपरा आहे महिलांचा सन्मान होणाऱ्या या महाराष्ट्रात महायुतीने महिलांचा अपमान केला आहे. पंधराशे रुपये महिला भगिनींसाठी देतात हे पैसे महायुतीची नसून जनतेच्या कष्टाचे आहेत. निवडणुका जवळ आल्याने अनेक फसव्या घोषणा केल्या जात आहेत. पैसे परत करण्याची बेताल वक्तव्य सत्ताधारी आमदार करत आहेत आणि यावेळी व्यासपीठावर सर्व मंत्री उपस्थित आहेत या अत्यंत दुर्दैवी आहे .यांच्या मनातील आता ओठावर येऊ लागले आहे. राणा दांपत्य हे प्रसिद्धीसाठी नेहमी अशी बेताल वक्तव्य करत असतात.

राज्यात प्रचंड महागाई वाढली आहे. भाजीपाला महाग झाला आहे .बेरोजगारी वाढली आहे. या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष वळवण्यासाठी अमिष दाखवली जात आहे. हे गलिच्छ राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे.या वक्तव्याचा सर्व महिला भगिनी तीव्र निषेध करत असून महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व स्वाभिमानी महिलांची माफी मागावी अशी मागणी ही त्यांनी केली.

आ. राणांच्या वक्तव्याने महिलांचा अपमान
निवडणुका जवळ आल्याने महायुती सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या आहेत. रवी राणांसह इतर आमदारही मते न दिल्यास पैसे परत घेऊ अशी बेताल वक्तव्य करत आहेत. लोकशाहीमध्ये उघड उघड मते खरेदी करण्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय असून यामुळे महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला भगिनींचा अपमान झाले असून या वक्तव्याचा तीव्र निषेध करत असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...