spot_img
लाईफस्टाईलRathsaptami 2024 : आज रथसप्तमी ! 'या' राशींचे भाग्य फळफळणार

Rathsaptami 2024 : आज रथसप्तमी ! ‘या’ राशींचे भाग्य फळफळणार

spot_img

नगर सहयाद्री टीम : आज रथसप्तमी आहे. हिंदू संस्कृतीत रथसप्तमीला अनन्य साधारण महत्व आहे. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाचे पहिले किरण पृथ्वीवर पडले असे मानले जाते. यावर्षी रथ सप्तमी तिथी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.12 ते 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.55 पर्यंत होती. त्यामुळे शुक्रवार 16 फेब्रुवारी हा दिवस रथ सप्तमी तिथी मानला जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, रथ सप्तमीच्या दिवशी सूर्य देव विशेषत: काही राशीच्या लोकांवर कृपा करू शकतो. चला जाणून घेऊया याबद्दल..

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी रथ सप्तमी शुभ ठरू शकते. व्यापारी वर्गाला फायदा होईल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. आरोग्यही चांगले राहील.

मिथुन : रथ सप्तमी मिथुन राशीच्या लोकांना अनेक बाबतीत लाभ देऊ शकते. नोकरी-व्यवसायासाठी लाभदायक काळ आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. कोणताही वाद तुमच्या बाजूने सोडवला जाऊ शकतो.

कर्क : कर्क राशीचे लोक जे कोणत्याही स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांना यश मिळू शकते. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना बनू शकते. वैयक्तिक जीवन देखील रोमँटिक असेल.

सिंह : सिंह राशीच्या लोकांना समस्यांपासून थोडा आराम वाटू शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल, त्यांना चांगली कामगिरी करता येईल.

सूचना – ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली असून आम्ही याची पुष्टी करत नाही

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...