spot_img
अहमदनगर"विधानसभा निवडणुकीत नेत्यांना फिरू देणार नाही"; 'या' योजनेसाठी रास्तारोको करत दिला इशारा

“विधानसभा निवडणुकीत नेत्यांना फिरू देणार नाही”; ‘या’ योजनेसाठी रास्तारोको करत दिला इशारा

spot_img

बाबा महाराज झेंडे | साकळाई योजनेसाठी चिखली येथे रास्तारोको आंदोलन
अहमदनगर । नगर सहयाद्री 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर, श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या साकळाई योजनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. साकळाई योजनेसाठी पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र तातडीने देऊन योजना मंजूर करण्यात यावी अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अगोदर साकळाई योजना मंजूर न झाल्यास नेत्यांना मतदारसंघात फिरु देणार नसल्याचा इशारा साकळाई कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे यांनी दिला.

साकाळाई योजनेसाठी पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देऊन तातडीने योजना मार्गी लागावी यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साकळाई कृती समिती व शेतकर्‍यांनी नगर दौंड महामार्गावर चिखली येथे रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. सुमारे दीड तास रास्तारोको आंदोलन सुरु होते. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोनामध्ये संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ आक्रमक पवित्रा घेत सरकार विरोधात हल्लाबोल केला. आंदोलनादरम्यान पोलिस व आंदोलकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. आंदोलनासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. साकळाई कृती समितीच्यावतीने जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सौ. अनुराधा नागवडे, घनश्याम अण्णा शेलार, मार्केट कमिटी संचालक रामदास झेंडे, बाळासाहेब नलगे, माजी सभापती भैया लगड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब नलगे, बाबा महाराज झेंडे, समाजसेवक भापकर गुरुजी, नारायण रोडे, रोहिदास उदमले, सोमनाथ धाडगे, निलेश लंके, विलासराव रणसिंण, कुलदीप कदम, चेअरमन गोरख झेंडे व चिखली, कोरेगाव, घुटेवाडी, हिवरे काळेवाडी, वडगाव तांदळी, रुईछत्तीशी लाभधारक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

नागवडेंनी दिले बैठक घेण्याचे आश्वासन
गेली ४०-५० वर्षांपासून साकळाई योजनेचा विषयी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी समोर येतो. परंतु, अद्यापही त्यावर तोडगा निघालेला नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साकळाईचा मुद्दा उपस्थित झाला आहे. साकळाई योजना मार्गी लागण्याबाबत आपण कृती समिती व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक घडवून आणू असे आश्वासन अनुराधा नागवडे यांनी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चोंडीत कोंडीच!, राम शिंदे सरांनी मारली बाजी!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- थोरल्या पवारांचा नातू म्हणून ओळख राहिलेल्या कर्जत- जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित...

चौंडीतील मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ 10 मोठे निर्णय; वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त फडणवीस सरकारने प्रथमच अहिल्यानगरच्या...

धारदार शस्राने तरुणावर सपासप वार; नगरमधील घटना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- किरकोळ वादातून टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यात...

आ. विक्रम पाचपुते यांना न्यायालयाचे पकड वॉरंट; कारण काय?

अहिल्यानगर । मगर सहयाद्री:- श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि साईकृपा शुगर ॲण्ड अलाईड लिमिटेड,...