spot_img
अहमदनगर'रसिक'चे निल फलक प्रेरणा देणारे ठरतील : आमदार संग्राम जगताप

‘रसिक’चे निल फलक प्रेरणा देणारे ठरतील : आमदार संग्राम जगताप

spot_img

स्व. सुरेश जोशी यांच्या निवासस्थानच्या नील फलकाचे अनावरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे काम स्व.सुरेश जोशी किती निस्वार्थपणे करत होते हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांनी या कार्याला स्वतःचे पूर्ण जीवन समर्पित करत हा ऐतिहासिक वारसा जपला व संवर्धन केला आहे. वस्तू संग्रहालयाला दुरावस्थेतून बाहेर काढण्यासाठी स्व.सुरेश जोशींनी स्वतःला झोकून देत काम केले. त्यांचे हे योगदान कधीही विस्नमरणात जाऊ नये म्हणून त्यांच्या घरावर निल फलक लावून त्यांच्या स्मृती रसिक ग्रुपने जपल्या आहेत. हा निल फलक कायम इतरांना प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

थोर इतिहास संशोधक व नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे माजी कार्यकारी विश्वस्त स्व.सुरेश जोशी यांच्या आगरकरमळा येथील निवासस्थानी रसिक ग्रुपच्या वतीने लावण्यात आलेल्या निलफलकाचे अनावरण आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे होते. यावेळी रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ.रवींद्र साताळकर, चंद्रशेखर जोशी व महेश जोशी आदींसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, रसिक ग्रुप कायमच विधायक व रचनात्मक कार्यक्रम करून आपल्या वेगळ्या कामाचा ठसा उमटत आहे. सुरेश जोशी यांच्या घरावर निल फलक लावून त्यांच्या स्मृती कायम जागृत केले आहेत. लवकरच एक दिवसीय नगर दर्शन सहलीचे आयोजन करण्याच्या मानस आहे. जेणेकरून नगर मधील पर्यटनाला चालना मिळेल.डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले, अहिल्यानगर मधील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय सुरेश जोशी यांनी जपत मोठे ऐतिहासिक काम केले आहे. ते उत्कृष्ट लेखक होते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत संघटनेची त्यांच्याकडे खूप मोठी माहिती होती. वस्तु संग्रहालयाच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य सुरू केले होते ते कार्य मी पुढे नेत आहे.

प्रस्ताविकात रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर म्हणाले, स्वर्गीय सुरेश जोशी यांनी आयुष्यभर वस्तु संग्रहालयाच्या संवर्धनासाठी केलेले कार्य खूप मोठे होते. त्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवत हे काम केले. अशी निस्वार्थ व्यक्तिमत्व आता दुर्मिळ होत चालली आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरावर हा निल फलक लावला आहे.
यावेळी इतिहास तज्ञ भूषण देशमुख, प्रा.नवनाथ व्हावळ, माजी नगराध्यक्ष प्रेमकुमार गिल्डा, साहित्येक सरोज आल्हाट व शब्बीर शेख, डॉ.महेश बुलाख, राजेंद्र टाक, अ‍ॅड.झरकर, बाळासाहेब देशमुख, शाम शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते. ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या जडणघडणीत योगदान देणारे नारायण आव्हाड यांचा रसिक ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. रसिक ग्रुपच्या शारदा होशिंग यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल उपाध्ये यांनी आभार मानले. पाहुण्यांचा सत्कार प्रशांत आंतेपोलू व प्रसन्ना एखे यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...