spot_img
ब्रेकिंगराष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा स्वबळावरच लढणार

राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा स्वबळावरच लढणार

spot_img

आ.महादेव जानकर / पक्षच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा नगरमध्ये संपन्न
अहमदनगर / नगर सह्याद्री –
राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यातील ९० हजार ७०० पोलिंग बूथ पैकीआ ६२ हजार पोलिंग बूथ पक्षाने बांधली आहेत. सर्व जिल्ह्यामध्ये संघटन वाढत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती, शिरूर, परभणी, माढा, नगर, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. राज्यात माझ्या पक्षाचे खासदार व आमदार होणार हे नक्की आहे. त्यामुळेच भाजप व कॉंग्रेस बरोबर येण्यासाठी माझ्यामागे लागले आहेत. मात्र येणारी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढणार आहे. आज माझ्याकडे इतर पक्षातिल अनेक जण तिकीट मागत आहेत. नगरमध्ये पक्षाचे संघटन अजून मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसून पायाला भिंगरी लावावी. याआधी भाजप बरोबर युती केली होती. मात्र त्यांनी आमच्या तोंडाला पाने पुसली. भाजप व कॉंग्रसने देशाची वाट लावली आहे. त्यामळे आगामी काळात जनतेला राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून एक चांगला पर्याय निर्माण होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.महादेव जानकर यांनी केले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा पदाधिकारी मेळावा आ.जानकर यांच्या उपस्थितीत नगरमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, मेळाव्याचे अध्यक्ष डॉ.प्रल्हाद पाटील, खानदेश अध्यक्ष शरद बाचकर, जिल्हाध्यक्ष शहाजी कोडकर, महिला अध्यक्षा सुवर्णा जऱ्हाड, मंदाकिनी बडेकर, नाना जुंदरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

आ. जानकर म्हणाले, राज्यात ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातींना कोणीही वाली नाहीये. त्यामुळे राज्यात या समाजाची अवस्था सैरभैर झाली आहे. म्हणून ओबीसींचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय या समजांना न्याय मिळणार नाही. यासाठी सर्व ओबीसी, भटक्या समाजाने एकत्र यावे. आज गोपीनाथ मुंढे असते तर हे समाज असे सैरभैर झाले नसते. असे सांगून स्वबळावर लोकसभा निवडणुक लढण्यासाठी पूर्ण ताकदीने तयारी करण्याचे आवाहन केले.

यावेळी रवींद्र कोठारी म्हणाले, राज्यात भाजप, कॉंग्रस व राष्ट्रवादी जाती जातींमध्ये भांडणे लावून आपले राजकीय हित साधत आहेत. त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. महादेव जानकर यांच्या सारखे त्यागी नेतृत्व राष्ट्रीय समाज पक्षाला लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुका आपण स्वबळावर लढून जिंकायच्या आहेत. यासाठी बूथ रचनेला प्राधान्य द्यावे. यावेळी अनेकांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. रवींद्र कोठारींना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...