spot_img
अहमदनगर'अहिल्यानगरमध्ये रमजान ईद उत्साहात'

‘अहिल्यानगरमध्ये रमजान ईद उत्साहात’

spot_img

हजारो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर केली सामुदायिक नमाज अदा; एकात्मता व शांततेसाठी प्रार्थना
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
नगर शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) सोमवारी (31 मार्च) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी 10 वाजता ईदची सामुदायिक नमाज कोठला येथील ईदगाह मैदानात अदा करण्यात आली. मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. नमाजसाठी शहरातील मुस्लिम बांधव आबालवृद्धांसह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. रमजानच्या महिन्यात केलेल्या रोजा (उपवासाची) सांगता ईदच्या दिवशी झाली.

रमजान महिन्याच्या 29 उपवासांनंतर रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी ईद सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागांतील मशिदमध्ये सकाळी सात वाजल्यापासून ईदच्या नमाजाची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मशिदमध्ये मुस्लिम भाविकांनी नमाज अदा केली. ईदगाहच्या सामुदायिक नमाजानंतर धार्मिक एकात्मता आणि देशाच्या समृद्धी व शांततेसाठी अल्लाहचरणी प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम समाजाच्या वतीने काही युवकांनी वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध दर्शविणारे फलक झळकावले.

ईद शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदान व शहरातील विविध भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठला येथून जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. नमाजनंतर शहरातील विविध कबरस्तान व दर्ग्यांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गद केली होती. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले व बिर्याणीचा बेत होता. रविवारी झालेला गुढी पाडवा व सोमवारी झालेल्या ईदचा उत्साह शहरात दिसून आला. शहरात दिवसभर मुस्लिम बांधवांसह इतर समाजबांधवांनी एकमेकांना भेटून ईदच्या व पाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा देत होते. यानिमित्त शहरात सामाजिक एकतेचे दर्शनही घडले.

व्यवस्था न केल्याने नाराजी
ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोणतीही व्यवस्था केली गेली नसल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. दरवर्षी महापालिकेच्या वतीने ईदगाह मैदान येथे मांडव टाकून शांतता समिती सदस्य, पोलीस प्रशासनातील अधिकारी, महापालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी वर्ग नमाजला आलेल्या मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प वाटून ईदच्या शुभेच्छा देतात. मात्र या वर्षी कोणत्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने व शुभेच्छा देण्यासाठी अधिकारी वर्ग देखील उपस्थित नसल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...